कोरपना (चंद्रपुर, महाराष्ट्र): सर्च फाउंडेशन चंद्रपूर संचलित स्कॉलर्स सर्च अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज, कोरपना येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सर्च फाउंडेशनचे संस्थापक इंजि. दिलीप झाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संजय ठावरी, उत्तमराव पाटील मोहितकर, बबीता राजभर, मीनानाथ पेटकर, शाळेचे प्राचार्य, राहुल उलमाले व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तम पाटील मोहितकार याच्या हस्ते ध्वजारोहण करून पुढे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून, गाण्यांमधून व नृत्यांमधून आपले देशाप्रतीचे प्रेम व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी सृष्टी खिरटकर व तनिषा कुळसंगे यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्या करिष्मा साटोने यांनी केले. अध्यक्षीय भाषणतुन इंजि. दिलीप झाडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले, कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच स्कॉलर्स सर्च अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी रिया पिंपळशेंडे हिने केले.
Also Read-
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कॉलर्स सर्च अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक वर्ग मिस सारिका, मिस प्रणाली, मिस भावना, मिस तनुजा, मिस प्रियंका, मिस उज्वला, मिस मिसबा, मिस प्रांजली, मिस दिव्या, मिस पूजा, मिस नेहारिका, मिस उज्वला जा मिस रुपाली, मिस शारदा, मिस वर्षा, मिस प्रीती, मिस सीमा, मिस हेमलता, संतोष सर, विशाल सर ,हर्षल सर, छबन सर, शाम सर, संकेत सर, गौरव सर, सुमेग सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचा सहभाग दर्शवला.