नांदेड (प्रवीण धूरटकर ची रिपोर्ट) : नॅशनल धोबी महासंघ यांच्यातर्फे नांदेड (महाराष्ट्र) येथे 24 मे ला वधू-वर व पालक परिचय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 180 ते 190 वधू-वरांनी आपला परिचय दिला। यावेळी डॉक्टर, इंजिनियर, ग्रॅज्युएट आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आपल्या पालकांसोबत उपस्थित होते. वधू-वर परिचय मेळावा खेळी मेळीच्या वातावरणात मुला-मुलींनी स्टेजवर येऊन परिचय दिला गेला. या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग विभूतवार व डॉक्टर सौ. आशाताई विभूतवार हे होते. आयोजकांनी सांगतिले की वधू-वर सूचक मेळावा खूप आनंदी वातावरणात पार पाडला.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय रजक, कार्याध्यक्ष अनिलज शिंदे, राष्ट्रीय महासचिव राजीव दिवाकर, राष्ट्रीय अध्यक्ष महिला डॉ. रजनी लुंगसे, राष्ट्रीय सचिव राजजी परदेशी, संघटक मंत्री प्रवीण धूरटकर, राष्ट्रीय महिला महासचिव सौ. आशा राज परदेशी, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. पंढरीनाथ रोकडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिलजी मोरे व वधू-वर संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र अध्यक्ष महिला सौ. वैशाली केळझरकर व युवा प्रदेश अध्यक्ष अजय श्रीनिवास उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालाजीराव ईबीदार प्रसिद्ध उद्योजक नांदेड हे होते. याचे आयोजक वामनराव पेनुरकर, संतोष ओंडीकर, पिंटू मारवाडीकर, कोंडीबा मांजरमकर, बाळासाहेब लोणवडे, एस जी माचनवार, नवनाथ भंडारे, मार्तंड भंडारे, प्रमोद भंडारे, बाबुराव कलोरे, मारोतराव सुरुंगवाढ, पिंटू मारवाडीकर, गोविंदराव कुंटूरकर, अशोक मुक्तेवार, करण तेलंग, राजू येवले, लक्ष्मण कोपरे माचनुरकर उपस्थित होते.
Also Read-

याच्या पहले म्हणजे 23 में ला नांदेड येथे संध्याकाळी नॅशनल धोबी महासंघ तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत 24 तारीखेला नांदेड येथे हॉटेल विसावा येथे होणाऱ्या भव्य वधू वर मेळाव्या संदर्भात व संघटनेच्या विविध पदांच्या नियुक्ती व आरक्षण संदर्भात माहिती देण्यात आली. नॅशनल धोबी महासंघाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉ अजय रजक (बिहार) यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांना राष्ट्रीय मीडिया प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रो. डॉ. रजनी लुंगसे यांची राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी, आशा राज परदेशी यांची राष्ट्रीय महिला सचिव, रजनी रजक यांची छत्तीसगड महिला राष्ट्रीय सांस्कृतिक विभाग प्रमुख, तराळे साहेब यांची छत्तीसगड व मध्य प्रदेश विभाग संघटक पदी, बडोदा येथील आशाताई वाल्हे यांची गुजरात महिला प्रदेशाध्यक्षपदी, एडवोकेट संतोष शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश तंटामुक्ती अध्यक्ष, डॉ. विभूतवार यांची वैद्यकीय सेवा विभाग अध्यक्षपदी, नागपूर येथील रेखाताई पाटील यांची महिला कार्याध्यक्षपदी तर डॉक्टर आशाताई विभूतवार यांना मराठवाडा विभाग महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आल्या.

यानंतर राष्ट्रीय स्तरावरील सर्व नेत्यांनी एकमताने घोषित केले की यापुढे धोबी बांधवांचे काम प्रेस आणि धुणे या संदर्भात इतर समाजातील लोक या व्यवसायावर गदा आणत आहेत व हा व्यवसाय अतिक्रमण करून सांभाळत आहेत. परंतु आमच्याच मुलांना नोकऱ्या नाहीत व व्यावसायिक दृष्ट्या आमच्या व्यवसायाला दुसऱ्यांनी हस्तगत केल्यामुळे आम्हाला आर्थिक संकट भेडसावत आहे. या दृष्टीने विचार करता धोबी समाजाचा व्यवसाय फक्त धोबी बांधवांनीच करावा इतरांनी आमचा व्यवसाय सांभाळून आमचे आर्थिक नुकसान करू नये अन्यथा यावर विचार केला जाईल असे जाहीर केले. तसेच धोबी बांधवांनी कोरोना काळात सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केलेली आहे. हॉस्पिटल मध्ये असलेले रुग्णांचे कपडे धोबी धुतो तसेच महिलांचे बाळंतपणाच्या काळातील कपडेही धोबी बंधू-भगिनींना धुवावे लागतात. गलिच्छ घाणेरडे अत्यंत वास येणारे कपडे यांच्या संपर्कात धोबी बांधव राहून स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देत नाही तरीही समाज आणि राजकीय व्यवस्था त्यांच्या न्याय मागण्याकडे लक्ष देत नाही.

पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष अजय रजक, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अनिल शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष प्रो. रजनी लूंगसे, राष्ट्रीय महासचिव राजू दिवाकर , राष्ट्रीय सचिव राज परदेशी, राष्ट्रीय संघटन मंत्री प्रवीण धुराटकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल मोरे, एडवोकेट जगदीश कुंवर, एडवोकेट संतोष शिंदे, प्रा. डॉ. सौ. उषाताई फाले, कर्नाटक बिदर येथून आलेले नवनाथ आप्पा रजत व विजयालक्ष्मी रजत,अजय श्रीवास, महिला प्रदेश अध्यक्ष सौ वैशालीताई केळझरकरर मेश, रावसाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले. पत्रकार परिषदेत एकता बहुउद्देशीय संस्था अशोक देवीदिन चौधरी, सचिव सौ. गीता प्रेम परदेशी सर्व पदाधिकारी तसेच सुभाष बुंदेले छत्तीसगड, भारती रजक छत्तीसगड व मध्य प्रदेश महिला संघटक व नांदेड शहरातील नॅशनल धोबी महासंघाचे वामनराव पेनूरकर, संतोष औंढेकर कोंडीबा मांजरमकर, पिंटू मारवाडीकर, मार्तंड भंडारे, नवनाथ भंडारे, बाळासाहेब लोणावळे, माचनवर. गोविंदराव कुंटूरकर, लक्ष्मण कापसे, माचनुरकर, राजू येवले व नांदेडकर समाज बांधव उपस्थित होते.






