कर्मयोगी फाऊंडेशन: सुजिता व हर्षा त्यांच्या चेहऱ्यावर फुलविला हास्य, केली लग्नाला साठी १० हजार ची मदत

नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन २०२४ मध्ये गाडगेबाबांचे विचार जपत आईवडिलांचे छत्र हरविलेल्या गरिबांच्या मुलींच्या लग्नाला कोणतीही मदत, उपकार नव्हे तर मानव जातीचे परम कर्तव्य निभावत प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक सहकार्य करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा संकल्प केला आहे. कर्मयोगीने या संकल्पाची दुसरी मदत ३१ मार्च ला गुमगाव ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे केली.

येत्या १७ एप्रिल ला सुजिता गाटकीने या उच्चशिक्षित बीएस्सी झालेल्या मुलीचे लग्न होत आहे. जीवनाच्या नवीन पर्वात ती प्रवेश करणार आहे. बालपण हालाकीच्या परिस्थितीत गेले. आता तारुण्यात पदार्पण करताच, भावी आयुष्याचे स्वप्न पाहत असताना, वडिलांना हृदयविकाराच्या झटक्याने काळाच्या पडद्याआड नेले. त्यानंतर आई आपल्या दोन रूमच्या मातीच्या घरात अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत कबाडकष्ट करत हातावर आणून पानावर खात आपल्या सुजिता, हर्षा, नेहा तिन्ही मुलींचे पालनपोषण करत उच्चशिक्षण देत आहेत.

यात मुली सुद्धा सुटीच्या दिवशी कामाला जाऊन आपल्या आईच्या कष्टाला हातभार लावत आहेत. तरीही परिस्थितीमुळे दोन नंबरची मुलगी हर्षाला आपले बीकॉमचे शिक्षण थांबवावे लागले. रंजना ताईंना तीन मुली असल्यामुळे त्यांना लग्नाची चिंता लागली असतानाच यावर्षी मोठ्या मुलीच्या लग्नाचा योग जुळवून आला. लग्न तर जुळले आता पुढचा खर्च कसा करणार हा प्रश्न रंजना ताईला पडला आहे. त्यासाठी त्या बचत गटातून कर्ज काढत आहेत. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत कर्मयोगीने सुजिताचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी कर्मयोगीने गुमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते धनराजजी घटे यांच्या हस्ते १० हजार रुपयांची मदत करत तिला साडीचोळी देऊन तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

तसेच हर्षाने आपले थांबलेले शिक्षण पूर्ण करावे यासाठी पुढील शिक्षणाचा खर्च कर्मयोगी फाऊंडेशन करणार हे सांगून हर्षाच्या शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या. यावेळी सुजिताने आपल्या भावना व्यक्त करताना अश्रूनयनांनी सांगितले की बाबा गेले तेव्हा रडणारे अनेक होते, परंतु जेव्हा मदतीची गरज जाणवली तेव्हा सर्व दूर गेले. माझी आई प्रचंड कष्ट घेऊन आमचं घर चालवीत आहे. आज तुम्ही आमच्याघरी आले माझ्या लग्नाला सहकार्य केले व माझ्या बहिणीच्या शिक्षणाला मदत करणार अहात हे विचार एकूण मी इतकी प्रेरित झाली आहे की, भविष्यात कर्मयोगी सारखी संस्था स्थापन करून मोठ्या प्रमाणात गरिबांना मदत करण्याचं कार्य करेल असा आत्मविश्वास सुजिताने दर्शविला.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते धनराजजी घटे, माजी सरपंच उषाताई बावणे, माजी उपसरपंच नित्यानंद बोडाणे, माजी उपसरपंच पुष्पाताई साठवणे, विस्तार अधिकारी गजानन माहुलकर, विठ्ठलराव ढोले तसेच गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवार मोठया प्रमाणात उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X