स्कॉलर्स सर्च अकॅडमी ने साजरा केला उड़ान एक नई सोच-2025, कार्यक्रमा चे वक्ता म्हणाले की…

कोरपना (महाराष्ट्र) : सर्च फाउंडेशन संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमात सहभागी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार लोकप्रिय युवा तडफडार आमचे मार्गदर्शक मा देवराव दादा भोंगळे, कर्त्यव्यनिष्ट, लोकाभिमुख अधिकारी मा विकास राचेलवार साहेब (प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास चंद्रपुर), कोरपना पोलिस स्टेशन येशील कर्मठ, कर्तव्यदक्ष्य पोलीस इन्स्पेक्टर (ठाणेकर) मा डी. डी. राजपूत साहेब, मा अशोक बावणे सभापती कृषी उत्पण बाजार समिती कोरपणा,

शाळेचे संस्थापक इंजी. दिलीप झाडे, प्राचार्य मा संजय ठावरी, आबिद अली, उमेश कोल्हे, पुरुषोत्तम भोंगळे, मीनानाथ पेटकर, महेश देवकते, अरुण मडावी, प्रमोद कोडापे, दिनेश ढेंगळे, अमोल आसेकर जगदीश पिंपळकर, पुंडलिक पाटील गिरसावळे, पत्रकार अब्रार अलीजी, जयंत जेनेकर, कुंदा झाडे, बबिता राजभर इत्याद्दी मान्यवर शाळेचे प्राचार्य राहुल उलमांले, उपप्राचार्य करिश्मा साटोने, संतोष जेणेकर शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी व असंख्य पालक उपस्थित होते.

उडान एक नई सोच-2025 या विषयावरील कार्यक्रम सादर झाले. तसेच विविध स्पर्धेमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे संस्थापक अभियंता दिलीप झाडे यांनी कोरपना येथे 20 वर्षापासून स्कॉलर्स सर्च व जुनियर कॉलेज ज्ञानदानाचे कार्य करीत असून या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत आहेत. सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक अभ्यास करून आपले नाव उज्वल करावे व शिक्षणाची उंच भरारी घेऊन अवकाशात उडान भरावी असा संदेश अध्यक्षीय भाषणातून दिला.

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार भोंगळे आपल्या भाषणात म्हणाले की कोरपना क्षेत्रात स्कॉलर्स सर्च अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज एक उत्कृष्ट शाळा असून बरेच वर्षापासून शिक्षण क्षेत्रात उज्वल परंपरा कायम राखण्याचे कार्य या शाळेने केले आहेत. तसेच मा विकास राचेलवार साहेब एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणाले की 9 ऑगस्ट रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर द्वारा आयोजित केलेल्या आदिवासी दिनानिमित्त उपक्रमामध्ये स्कॉलर्स सर्च अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून विद्यार्थ्यांना पारितोषक मिळाले आहेत या शाळेचे शैक्षणिक प्रगती उत्कृष्ट दर्जाची चाललेली आहेत. मा डीडी राजपूत साहेब पोलीस इन्स्पेक्टर कोरपना यांनी सर्व विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेऊन चांगल्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहेत आणि अशीच उत्कृष्ट प्रगती करत राहाल असा संदेश विद्यार्थ्यांना व पालकांना दिला। मा अशोक बावणे यानी स्कॉलर्स सर्च अकॅडमीच्या प्रगती बद्दल शुभेच्छा दिल्या.

करोना नंतरची मरगळ झटकून पुन्हा नव्या विश्वासाने पुढील झेप घेण्यासाठी उडान-2025 चे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत दिमाखात, सुंदर सजावट, सादरीकरण करून विद्यार्थांनी आम्ही ग्रामीण भागात असूनही कुठेच कमी नाही हे दाखवून दिले. भरगच्च उपस्थिती नृत्य, नाटक, रॅम्प वॉक, इत्यादी कार्यक्रम दुपारी 1 वाजेपासून आरंभ झाले आणि सायंकाळी 7 वाजेपर्यंत बिनारोकटोक चालू होते. हे कार्यक्रम केजी ते इयत्ता 12 वीं पर्यंतच्या विद्यार्थांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा साटोणे, संतोष जेनेकर व विद्यार्थ्यांनी सांभाळली.

वार्षिक स्नेह सम्मेलनामध्ये बक्षीस वितरण उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हे सगळ कार्यक्रम पाहुण पालकांनी विश्वास व्यक्त केले की स्कॉलर्स सर्च अकॅडमी पुन्हा नवीन उडान भरून परिसरातील विद्यार्थांसाठी उत्कृष्ट, कौशल्य युक्त, शिक्षणाचे नवीन दालन उपलब्ध करून समृद्ध करणार आहेत.

कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्कॉलर्स सर्च अकॅडमीच्या व जुनियर कॉलेज संपूर्ण शिक्षकगण- सारिका, दिव्या, तनुजा, स्नेहा, भावना, शारदा, प्रीती, प्रांजली, पूजा, प्रियंका, निहारिका, उज्वला व उज्वला झा, हेमलता, वर्षा, मिझबा, सीमा, रूपाली, विशाल, सुमेग, छबन, शाम, संकेत, हर्षल, गौरव व समस्त कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X