इंडियन इन्स्टिटयूट मॅनेजमेंट कडून चेंज मेकर पुरस्काराने कर्मयोगी फाऊंडेशन सन्मानित

नागपूर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशनने नागपूर जिल्ह्यातील विशेषतः नागपूर व हिंगणा तालुक्यातील २०६ गावात मोठ्या प्रमाणात समाजसेवेचे कार्य उभारले आहे. त्यात प्रामुख्याने कोरोना काळात निरंतर ७१ दिवस अन्नदान, मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाटप. दवाखान्यात चहा बिस्कीट, फराळ व जेवणाची व्यवस्था, मोक्षधामची स्वच्छता करत कोरोना काळात मृतांची राख उचलण्यापासून कार्य केलं.

आईवडील नसलेल्या मुलींना मोठ्या प्रमाणात सायकल वाटप. विधवा महिलांना स्वयं रोजगार करिता शिलाई मशीन वाटप, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, अल्पभूधारक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत. मोठ्या प्रमाणात निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप, नवरात्रात विधवा महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान, मुलींसाठी निःशुल्क अभ्यासिका, फुटपाथवर काम करणाऱ्यांना छत्री वाटप, ब्राम्हणी गावाला केंद्र सरकारचा स्वच्छ शक्ती पुरस्कार २०१९ मिळवून देण्यास अग्रस्थानी, ९४ गावात दुसऱ्यांचे सुखदुःख जाणत घरोघरी जाऊन प्रेमरूपी अभियान राबविले.

१६६ गावातील वृद्ध मंडळींना (कुबळी) आधार काठी वाटप यासारखे ४४ उपक्रम मोठया प्रमाणात राबविले. या सर्व कार्याची दखल घेत भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (IIM Nagpur) द्वारा शनिवार ९ डिसेंबर ला नागपूर येथे आयोजित वार्षिक ग्लोबल नागपूर समिट २०२३ मध्ये कर्मयोगी फाउंडेशन नागपूरला सामाजिक कार्यासाठी इंटेल यूएसचे ग्लोबल हेड अंशुल सोनक द्वारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांच्या उपस्थितीत “चेंज मेकर” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल सर्वच स्तरातून कर्मयोगी फाऊंडेशनचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

Archives

Categories

Meta

'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

X