नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशनने २०२४ मध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात निःशुल्क नेत्र तपासणी शिबीर राबवून, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देत ५ हजार वृद्ध मंडळीना चध्मे वाटप करून त्यांच्याप्रती कृतज्ञता जपण्याचा संकल्प केला आहे.
याच पाश्वभूमीवर १३ जानेवारी ला कर्मयोगी फाऊंडेशन, ग्रामपंचायत टाकळघाट व महात्मे नेत्र रुग्णालया नागपूर यांच्या सयुक्त विद्यमाने निःशुल्क नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिर जिल्हा परिषद शाळा बीड गणेशपूर येथे आयोजित करत १२७ व्यक्तीची तपासणी करुन त्यात २४ रुग्ण मोतीबिंदु असल्याचे आढळले आणि ६२ मंडळीना निःशुल्क चष्माचें लवकरच वाटप करण्यात येणार आहे. मोतीबिंदू असलेल्या रुग्णाची २ फेब्रुवारीला महात्मे नेत्र रुग्णालया नागपूर येथे निशुल्क शस्त्रक्रिया करून देण्यात यईल.
यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक सरपंच शारदा शिंगारे म्हणाल्या की कर्मयोगी सारखी ग्रामीण भागात प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणारी संस्था मी आजपर्यंत बघितली नाही. कर्मयोगीचे कार्य २०७ गावात पोहोचले आहे त्याकरून त्यांच्या कार्याचा वेग आपल्या लक्षात यईल, त्यांच्या कार्याबद्दल जितके बोलावे तितके कमी अस त्या यावेळी आवर्जून म्हणाल्या.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य वेदांत वासाड, साधना मेश्राम, अनुराधा खंगार, बबिता बहादूरे, राजश्री पुंड, अंजना इरपाते, मीना डायरे ही मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत टाकळघाट व कर्मयोगी परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.