बोलते नव्हे तर कर्ते व्हा!
कर्मयोगी फाउंडेशनचे ध्येय वंचित, शोषित व गोरगरिबांना आधार, ग्रामविकास, भ्रष्टाचार मुक्ती, व्यसनमुक्ती तसेच आत्मीयतेने प्रत्येकाला भेटूया, मदतीचा, प्रेमाचा दीप लावूया, आनंदाचे जिव्हाळ्याचे वाटेकरी होऊया! कर्मयोगी फाउंडेशन ही जास्तीत जास्त खाजगी आस्थापनेत काम करणाऱ्या कामगाराची सेवाभावी संघटना असून ती कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या कृतिशील विचारसरणीवर “बोलते नव्हे तर करते व्हा!”
या तत्त्वावर सत्य, सातत्य, शिस्त व समर्पण या भावनेने कार्य करणारे सामाजिक संघटन आहे. ईश्वराने निरंतर कर्मयोगी फाउंडेशन ला समाजाची या सृष्टीची सेवा करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल आम्ही ईश्वरा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो इतके महान विचार कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे आणि त्यांचे २२ बावीस पुरुष पदाधिकारी आणि 22 महिला सदस्या आहे.
कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे
३१ ऑगस्ट २०२३ रोज गुरुवारला रक्षाबंधन निमित्त गरजवंत विधवा ताईंना आत्मनिर्भर करत १७ शिलाई मशीन देऊन त्यांच्या हातून राखी बांधून, बहीण भावाचं प्रेम जपून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले. या ऐतिहासिक आनंदाच्या क्षणाचे मी व माझी पत्नी, सौ लता लाखे साक्षीदार राहण्याची संधी प्राप्त झाली. येथे ५१ विधवा व गरजवंत ताईंना आत्मनिर्भर करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ५१ शिलाई मशीन वाटपाचा संकल्प आज कर्मयोगी फाउंडेशन तर्फे पूर्ण करण्यात आलेलेला आहे.
हे पण वाचा:
तसेच ह्या संस्थेचा देणगीदार सदस्य होण्याची मला संधी प्राप्त झाली याबद्दल सुद्धा मी कर्मयोगी फाउंडेशनचा ऋणी आहे. कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे आणि २२ पदाधिकारी २२ महिला जी टीम आहे यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. देणगीदारांच्या स्वरूपामध्ये त्यांना जी मदत होत आहे. ते दान प्रत्यक्ष संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराप्रमाणे गरजू पर्यंत पोहोचने आणि ती कृती पाहिल्यानंतर खरंच कौतुकास्पद ह्या टीमच कार्य आहे.
गरजू, वंचित, विधवा महिलांची निवड करून त्यांना स्वालंबी जीवन बनविण्यात आपण कसां भर देऊ शकतो ही खूप जमेची बाजू होय ! ह्या १७ शिलाई मशीन वाटप करताना उपस्थित पाहुणेमंडळी आणि श्रोत्यांच्या सुद्धा डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि पंकज ठाकरे आणि त्याच्या टीम मधील प्रत्येक सदस्य हा कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या कार्यस्वरूप दिसत होतं.
ही अतिशोक्ती नसून मी प्रत्यक्ष माझी पत्नी आणि मी साक्ष सत्यस्वरूपाने हे वर्णन करीत आहे. एखादी दुसरी संस्था असती तर त्या संस्थेची चालक लोकांनी आपल्या नातेवाईकाकडे, आपल्या सोयऱ्यांनकडे आणि आपल्या मर्जीच्या लोकांकडे हे दान पोस्ट केलं असतं पण ह्या लोकांनी अक्षरशः पूर्ण सभागृह वंचिता कडे हे दान गेल्यामुळे अश्रूंच्या धाराने साक्ष रूपाने प्रत्येकाच्या हृदय पटलावर हा उपक्रम विराजमान राहील. ह्या अशा कर्मयोगी फाउंडेशनचा “बोलते नाही कर्ते व्हा!” ह्या कर्तव्य स्वरूपाचा महिमा वर्णावा किती तेवढे कमी आहे.
लेखक- डी. एन. लाखे. (माजी सैनिक, आर.बी.आय. मोबाइल नंबर- 9422921286)