नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन हे सातत्याने ग्रामीण भागातील गोरगरीब गरजवंत मंडळींसाठी विविध उपक्रम राबवून सेवा देत आहे. त्यातच ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन कडून मोठ्या प्रमाणात निशुल्क आरोग्य शिबीर राबविण्यात येत आहेत.
याच क्रमात शनिवारला मौजा चिंचोली, अंतरगाव ता.लाखांदूर जि. भंडारा येथिल जिल्हा परिषद शाळेमध्ये कर्मयोगी फाऊंडेशन, जीवन आधार बहुउद्देशीय संस्था व शालिनीताई मेघे रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विध्यमाने महाआरोग्य शिबीर राबविण्यात आलें. यात चिंचोली व आजूबाजूच्या गावातील ६४५ नागरिकांनी महाआरोग्य रोग निदान शिबिराचा लाभ घेतला व त्यात १९५ लोकांचे रोग निदान करण्यात आले. त्यांचेवर शालिनीताई मेघे रुग्णालया नागपूर येथे ५ व ९ डिसेंबरला निशुल्क शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरचे अध्यक्ष अनिल कानेकर उदघाटक जीवन आधार संस्था नागपूरचे अध्यक्ष जीवन जवंजाळ, प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच प्रमोद प्रधान, अश्विन रडके, चंद्रशेखर रामटेके, संदीप कोरे, सदाराम दिघोरे, पंकज मातेरे, मंगेश राऊत ही मान्यवर मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती।
उद्घाटनिय प्रसंगी बोलताना जीवन जवंजाळ म्हणाले की कर्मयोगी नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक कल्याणाचं कार्य करत आहे. भंडारा जिल्ह्यात सुद्धा आम्ही कर्मयोगीच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबिर राबवू असे ते आवर्जून म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात अनिल कानेकर म्हणाले की या भागातील गरज ओळखून कर्मयोगी फाऊंडेशन खऱ्या अर्थाने गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार सरणीवर प्रत्यक्ष कृतींतून कार्य करत आहे. त्याबद्दल त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंचोली गाव वासीयांनी व कर्मयोगी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली..