मुंबई/धुळे/आकोला : राष्ट्रीय महिला धोबी महासंघाच्या अध्यक्ष प्रोफेसर रजनी लुंगसे शिरपूर यांना डेबुजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे 28 वे राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या साहित्य संमेलनात श्री राष्ट्रीय संत गाडगेबाबा साहित्य पुरस्कार-2026 ने सन्मानित करण्यात आले. या संमेलनात विविध साहित्यावर कार्यक्रम आयोजन केले होते. अत्यंत उत्साहाने व आनंदात साहित्य संमेलन पार पडले.

प्रोफेसर रजनीताई लुंगसे यांचा हा 22 पुरस्कार आहे. धोबी समाज तसेच इतर सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यामध्ये त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. संत गाडगेबाबांची शिकवण देत आहे. त्या दृष्टीने मानवतेचा धर्म रुजविण्यासाठी व्याख्याने आणि लेखणीच्या माध्यमातून त्या वैचारिक दृष्ट्या समाजाला योगदान देत आहेत. या संमेलनामध्ये गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षामध्ये रुजविणारे पुणे येथील संस्कार ग्रुपचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष यांना सन्मानित करण्यात आले.
संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्रजी फंड व कवी सरकार इंगळी कोल्हापूर यांच्या सुविद्य आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमध्ये भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे गुरुजी, डॉ. बाविस्कर, संदीप विद्यापीठाचे माजी कुलसचिव, महाराष्ट्र धोबी समाजाच्या कार्याध्यक्ष सौ. अमृतकर सुषमाताई, मनोज मस्के, अनिल हुपरीकर, दीन दलितांचा पालन हार सेवावृत्ती गणेश दळवी, कृष्णा भाऊ शिंदे, अरुण धोबी, ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्त्या सौ सुमनताई देसाई, सौ माया नवथर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये कार्यक्रम पार पडला.
Also Read-
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अमरावती, नांदेड ,पंढरपूर, बेळगाव, बीड, गडचिरोली, बार्शी, कोल्हापूर, वर्धा, शिरपूर, नाशिक, मुंबई भागातून सम्मेलनासाठी प्रमुख अतिथी व काव्य स्पर्धेसाठी काव्यवाचक, काव्य रसिक साहित्यिक उपस्थित होते.
