कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण

हैदराबाद : कर्मयोगी फाऊंडेशन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवित आहे. दर वर्षीप्रमाणे या वर्षी त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला।.

कर्मयोगी फाऊंडेशन, गायत्री परिवार, तरुण मित्र परिवार कानोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारला कानोली ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे वृक्षागंगा अभियाना अंतर्गत तरु मित्र तरु पुत्र या शीर्षकाखाली गायत्री यज्ञ करून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.

विशेषतः आंबा, चिकू, पेरू, जांभुळ, आवळा ही फळझाडे लावण्यात आली तर काही प्रमाणात वड, पिंपळ व कडुलिंबाची झाडे लावण्यात आली.

तसेच या झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी सर्व झाडांना कठडे लावण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री परिवार, कर्मयोगी फाऊंडेशन, कानोली मित्र परिवार व गाककरी मंडळीनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X