नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे विचार जपत प्रत्येक कार्य हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर प्रत्यक्ष कृतीतून करत आहे. कर्मयोगीने अक्षय तृतीया सण ब्लड कॅन्सर आजाराने ग्रस्त असलेल्या बीड गणेशपूर ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील ची. स्पर्श जयंत लेदे यांच्या घरी जवून त्यांना प्रेमाचा, आधाराचा मदतीचा हात देत साजरा केला.

पोटाची खळगी भरण्यासाठी चंद्रपूर वरून औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी येथे आपल्या स्पर्श व प्राजक्ता या दोन लहान मुलांना घेऊन आलेले जयंत लेदे व त्यांच्या पत्नी संगिताताई यांनी बीड गणेशपूर येथे आश्रय घेत ठेकेदारीत दोनही पति-पत्नी काम करत हातावर आणून पानावर खात आपल्या दोन मुलांना जिल्हा परिषद शाळेत टाकून त्यांना खूप मोठं करण्याच्या उद्देशाने आनंदात जीवन जगत होते.

संघर्षमय आनंद सुद्धा नियतीला मंजूर नोव्हता, नियतीच्या मनात तर वेगळेच होते २०२३ मध्ये स्पर्शला वयाच्या बाराव्या वर्षी ब्लड कॅन्सर झाल्याचे कळले. हे ऐकून आईवडिलांच अवसानचं गळाल. मोठ्या हिमतीने त्यांनी या परिस्थितीला तोंड देत आपल्या मुलावर उपचार करण्याचे ठरविले. जवळपास गेल्या ६ महिन्यात साडेतीन लाख रुपये लागून गेले. आतापर्यंत नातेवाईक व काही लोकांच्या मदतीने हे शक्य झाले. परंतु आता पुढे काय या विचाराने दोन्ही माणसं चिंतेत असतानाचं जयंतराव यांचे काम बंद झाले. संगिताताई २०० रुपये रोजाने एकट्याच कामाला जातात. या दोनशे रुपयात घर चालवावे, मुलाच्या आजाराला पैसे लावावे की लोकांचे पैसे द्यावे या मोठ्या समस्येने ग्रासलेल्या ताईला आपल्या स्पर्शला ब्लड कॅन्सर या आजारातून मुक्त करायचे आहे. त्यासाठी आपल्या ७२ वर्षीय आईला सोबत घेऊन जयंतराव व संगिताताई सातत्याने धडपड करत आहे.
यह पण वाचा-
त्यामुळे या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत जयंतराव व संगिताताई यांच्या वेदना कमी करण्यासाठी कर्मयोगीने स्पर्शच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी अक्षय तृतीया सणाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. पुढील तीन महिन्यांत प्रत्येक महिन्याला ५००० हजार रुपये देत एकूण २५००० हजार रुपयांची मदत करून गाडगेबाबा यांचे विचार कृतीतून जपणार आहे. कर्मयोगीच्या या कार्याचे सर्विकडे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कर्मयोगी कडून स्पर्शला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळा बीड गणेशपूरचे मुख्याध्यापक मुकुंद श्रीरामे शिक्षक गजानन लाड गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
