कर्मयोगी फाऊंडेशन: गरजवंत विधवा ताईंना शिलाई मशीन देत साजरे केले राक्षबंधन

कर्मयोगीची ५१ शिलाई मशीन वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती
तीन टप्यात ५१ शिलाई मशीनचे यशस्वी वाटप
आईवडील सोबत तरच सदस्यत्व ही अट असणारी कर्मयोगी जगातील पहिली संस्था: राजेश खवले

नागपुर: कर्मयोगी फाऊंडेशन बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वानुसार २०२१ चा ५१ शिलाई मशीन वाटपाच्या यशस्वी संकल्पानंतर २०२३ मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या इतर समाजसेवी उपक्रमासोबत गोरगरीब विधवा ताईंना ५१ शिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा जो संकल्प पुनश्च केला होता.

त्याची सुरुवात ९ मार्चला तुकाराम बीज या दिवशी पहिल्या टप्प्यातील १७ शिलाई मशीन देऊन तीन टप्यात ८९ गावात सर्वेक्षण करून ३५ गावातील गरजवंत शिवणकला हस्तगत असणाऱ्या महिलांना या संकल्पाचे व्यवस्थित नियोजन करून प्रत्येकी १७ शिलाई मशीन वाटपाचे तीन टप्पे पाडून दुसरा टप्पा ३० जुलैला १७ मशिनचा घेऊन व ३१ ऑगस्ट २०२३ ला राक्षबंधनचे औचित्य साधत आई सभागृह बुटीबोरी येथे संकल्पपूर्ती कार्यक्रमात १७ गरजवंत विधवा ताईंना शिलाई मशीन देऊन, त्यांच्या हातून राखी बांधून त्यांना बंधुत्व देत ५१ शिलाई मशीन वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरुपती बहुउद्देशीय संस्था नागपूरचे सचीव प्रकाश नेऊलकर, उदघाटक व्यवस्थापकीय संचालक महाज्योती नागपूरचे राजेश खवले, प्रमुख उपस्थिती अधिष्ठाता आंतर्विद्या अभ्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विध्यापिठाचे प्रशांत कडू, कॅल्डेरीस इंडिया रिफॕक्टरीज बुटीबोरीचे महाव्यवस्थापक सुबोध दुबे, जीवन आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाळ व सरोज मोहंता ही मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रकाश नेऊलकर म्हणाले की दोनशेच्या वर गावात आपल्या ४३ उपक्रमाद्वारे सेवेचं व्रत घेऊन जाणे हे काही सोपं काम नाही, परंतु कर्मयोगीने आपल्या कार्यात सातत्य राखत ते शक्य करून अनेक दुःखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे, या संस्थेच्या बाबतीत जितकं बोलावं व त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे.

उदघाटनिय भाषणात राजेश खवले म्हणाले की कर्मयोगीच्या कार्यक्रमाला उपस्थित असणं हेच माझं मी भाग्य समजतो कारण येथे आपला अहंकार बाहेर सोडून कार्यक्रमात यावं लागतं, आईवडिलांचा सांभाळ करत असाल तरच कर्मयोगीच सदस्यत्व मिळतं त्यामुळे अशी अट असणारी जगातील एकमेव संस्था असेल असं मला वाटतं. यावेळी त्यांनी कर्मयोगीच्या कार्याचं भरभरून कौतुक करत महाज्योती द्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात माहिती दिली.

या राक्षबंधन कार्यक्रमाला पहिल्या टप्प्यापासूनच्या जवळपास सर्वच महिलांनी उपस्थिती दर्शवून सर्व पुरुष मंडळींना राखी बांधून सुमधूर जेवणाचा आस्वाद घेत, आनंदमय वातावरणाची निर्मिती करत हा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न झाला. खरोखरच संकटकाळात कर्मयोगी फाऊंडेशनने आमच्या जीवनाला आधार दिला व इतकं भरभरून प्रेम देणारा आमच्या आयुष्यातील हा पहिला कार्यक्रम होय, हे अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत बोलून दाखवीलं.

या कार्यक्रमाला संजय धोटे, देवीदास लाखे, सचिन नायडू, टाकळघाटच्या सरपंच शारदा शिंगारे, सातगावचे सरपंच योगेश सातपुते, राजीव गावंडे, मोहन खरबडे पत्रकार संदीप बलविर ही प्रतिष्ठित मंडळी व अनेक गावावरुन आलेली मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. हा संकल्प यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X