MIDHANI
नागपुर/हैदराबाद: कर्मयोगी फाऊंडेशन सातत्याने कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची विचारसरणी घेऊन बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर दुःखीकष्टी , निराधार लोकांना सहकार्य करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य करत आहे. विशेष म्हणजे महिला सक्षमीकरणावर कर्मयोगी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.
MIDHANI
त्याच अनुषंगाने या वर्षी जो अधिकमास आला त्याचे औचित्य साधत आपल्याकडे जावयाला कपडे व दान करण्याची जी पद्धत आहे, त्यात नाविन्यपूर्णता आणत कर्मयोगीने हिंगणा तहसील मधील बीड बोरगाव या गावी जाऊन तेथील अदिवासी महिलां सोबत सोमवारला कार्यक्रम घेऊन विशेषतः विधवा व गरजवंत २४ ताईंना साडीचोळी देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
MIDHANI
यावेळी या महिला म्हणाल्या की आम्ही थकून भागून शेतातून आलो होतो व आल्यानंतर लगेच या कार्यक्रमाला आम्ही आलो येथे आम्हाला अतिशय सुंदर साड्या व सर्वात महत्वाचे म्हणजे जी प्रेमाची वागणूक दिली त्याने आम्हीभारावून गेलो आहे. या कार्यक्रमाला बीड बोरगाव येथील चंद्रभान कोवे, भाऊराव उईके ही प्रतिष्ठित मंडळी व गावकरी मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमगाव येथील नारायण बोंडे, राजेश माणुसमारे व कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.
कर्मयोगीने कृतीतून साजरा केला स्वातंत्र्य दिन
कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे सकाळी झेंडावंदन करण्यात आले. सायंकाळी दुर्गम भागातील परसोडी या गावी जाऊन त्यांना शालेय वस्तू वाटप करत त्यांना चॉकलेट व बिस्कीट देऊन त्यांचे तोंड गोड करत प्रत्यक्ष कृतीतून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे दुखीकष्टी गरजवंत लोकांना देण्याचे महत्त्व व ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं अशा थोर महापुरुषांचे प्रेरणादायी कार्य सांगून आपणही यातून प्रेरणा घेवून आपल्या गावासाठी खूप मोठं कार्य कराव असा संदेश विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना देण्यात आला.