कर्मयोगीची शिलाई मशीन देणार दुःखीकष्टी ताईंच्या जीवनाला आधार…
१७ गरजवंत विधवा ताईंना शिलाई मशीनचे वाटप…
गोरगरीब, दुःखीकष्टी लोकांची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य.. उद्योजक अनुप गुटगुटीया..
नागपुर/हैदराबाद: कर्मयोगी फाऊंडेशनने आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्त्वावर २०२२ मध्ये गरजवंत विधवा ताईंना ५१ शिलाई माशीनचे वाटप केले होते. यावर्षी सुद्धा त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ५१ शिलाई मशीन वाटपाचा संकल्प केला आहे. या संकल्पाचे तीन टप्पे पाडण्यात आले आहे.
त्यातील १७ शिलाई मशिनचा पहिला टप्पा तुकाराम बीजला पार पडला तर १७ शिलाई मशिन वाटपाचा दुसरा टप्पा जागतिक मैत्री दिनाचे औचित्य साधत ३० जुलै २०२३ राविवारला आई सभागृह बुटीबोरी येथे गरजवंत विधवा ताईंना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी १७ शिलाई मशीन देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत मैत्री दिन कृतीतून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता, आंतर्विद्या अभ्यास, राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज विद्यापीठ, नागपुरचे डॉ प्रशांत कडू उदघाटक व्यवस्थापकीय संचालक टीम फेरो अलॉयज प्रा. लि बुटिबोरीचे अनुप गुटगुटीया प्रमुख अतिथी अध्यक्ष निर्मल अर्बन सहकारी बँक नागपूरच्या पूजा मानमोडे संस्थापक अध्यक्ष क्षितिज फाऊंडेशन नागपूरच्या स्नेहल चौधरी, संचालक माया हॉस्पिटल बुटीबोरीचे डॉ दीपक देवतळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव म्हस्के ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
कर्मयोगी फाऊंडेशनने गराजवंत व विधवा ताईंना आत्मनिर्भर करत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ५१ शिलाई मशीन वाटपाचा संकल्प केला आहे, त्यापैकी १७ ताईंना शिलाई मशीन देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत १७ शिलाई मशीन वाटपाचा दुसरा टप्पा संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे १७ गरजवंत विधवा ताईंची निवड करण्यात आली आहे.
१) सौ. आश्विनी योगेश कावळे वय २५ वर्ष रायपुर हिंगणा
२) ग.भा. अर्चना दिलीप लाकडे वय ३८ वर्ष रायपुर हिंगणा
३) ग.भा. अंतकला कैलास तिनकर वय ४२ वर्ष शिरुळ
४) ग.भा. अंजली राजेन्द्र खोब्रागडे वय ४२ वर्ष वाडी
५) ग.भा. चंदा विनोद खंडाते वय ३९ वर्ष उखळी
६) ग.भा. दिव्या नितिन सातोकर वय २७ वर्ष वारंगा
७) सौ. दुर्गा रविन्द्र मोहनकर वय ३२ वर्ष देवळी आमगाव
८) ग.भा. दिव्या दिनेश चावके वय ३९ वर्ष न.व बुटीबोरी
९) सौ. कोमल प्रमोद हजारे वय २६ वर्ष खैरी पन्नासे
१०) ग.भा. कोमल कुंदन घरडे वय २९ वर्ष टाकळघाट
११) ग.भा. कविता संजय कामडी वय ३७ वर्ष डिगडोह पांडे
१२) ग.भा.ललिता नितिन नागोसे वय ४२ वर्ष सालईमेंढा
१३) ग.भा. माधुरी संजय नान्हे वय ३१ वर्ष टाकळघाट
१४) ग.भा. प्रिती संदिप चापडे वय ३१ वर्ष वर्धा
१५) ग.भा. सारिका पदमाकर गेडाम वय ३८ वर्ष टाकळी
१६) ग.भा. सिमा अरुण बोरकुटे वय ३९ वर्ष देवळी सांवगी
१७) ग.भा. वर्षा बालाजी सपाट वय ३९ वर्ष न.व.बुटीबोरी
यावेळी उदघाटनिय भाषणात उद्योजक अनुप गुटगुटीया म्हणाले की आमच्या परिवारापेक्षाही एक मोठा परिवार आपल्यासाठी आहे तो परिवार म्हणजे आपल्या सभोवताली असणारा समाज ,या समाजाची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. हेच काम कर्मयोगी खऱ्या अर्थाने करत आहेत. त्यांनी आपल्या संस्थेचं नाव सेवाभावी संघटना नाही ठेवले तर कर्मयोगी फाऊंडेशन हे सुंदर नाव ठेवले कारण ईश्वराने जे आपल्यावर प्रचंड उपकार केले आहे. त्या उपकाराची परतफेड सेवा म्हणून नव्हे तर आपलं कर्तव्य म्हणून ते करत आहेत म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत. या दुःखीकष्टी लोकांची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य आहे असे ते यावेळी आवर्जून म्हणाले.
कर्मयोगी फाऊंडेशन ग्रामीण भागातील ज्या महिलांना शिलाई मशीन काम येते परंतु परिस्थिती अभावी त्या शिलाई मशीन घेऊ शकत नाही अशा गरजवंत विशेषतः विधवा महिलांना मोठ्या प्रमाणात शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देणार अशी माहिती कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील मान्यवर मंडळी महिला मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.