नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी गेल्या तीन वर्षांपासून नाविन्यपूर्ण कल्पना राबवत गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी त्यांनी कर्मयोगीचा गणेशोत्सव दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गणेशांच्या चरणी या शीर्षकाखाली हा उपक्रम ११ दीवस चालणार आहे. या उपक्रमातुन दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गानेशांच्या जिद्द व संघर्षाला नमन करत त्यांना सन्मानित करून, चांगला माणूस बनत, सेवा व जबाबदारी हा धर्म जपून आपला मानवी जन्म सार्थक करण्याचा संदेश आजच्या माणुसकी हरवलेल्या व पैसाचं सर्वकाही झालेल्या या स्वार्थी जगात प्रत्यक्ष कृतीतून दिल्या जात आहे.
विशेष म्हणजे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आदर्श लोकांच्या हस्ते सपत्नीक या गौरी गणेंशांना सन्मानित करण्यात येत आहे. या चांगल्या उपक्रमाला सपत्नीक येण्याचे पाचारण कर्मयोगीने मला दिले. कार्यक्रमाला गेल्यावर माझ्या लक्षात आले की गणेश-गौरीची पुजा आम्ही दहा दिवस मोठ्या भक्तिभावाने करतो. त्यांच्याकडे धन-दौलत अनेक सुखाची मागणी करतो. अशा सार्वजनीक उत्सवात पैशाची उधळण मोठ्याप्रमाणात होते.
पण सामाजीक भान असणारे बुटीबोरीचे कर्मयोगी फांऊडेशनचे श्रमीक हात समाजातल्या गरीब कष्टकरी कुटुंबातील अभ्यासू विद्यार्थ्यांना शोधून त्यांना भावी शिक्षणासाठी त्यांचा सन्मान करून तन-मन-धनाची हिम्मंत देतात. खऱ्या जीवंत गौरी-गणेशांची आराधना करतात. तरूण मित्रांनो पुस्तकांसोबतच सभोवतालचा समाजवाचन शिकां तुम्हाला त्यातूनच प्रगतीच्या वाटा सापडतील. जीवनातील अपयशाच्या वेळेस तुमच मन आत्महत्येसारखा बुजदील मार्ग कधी न स्विकारता हिम्मतीने आपल ध्येय गाठेल. थोर संत महापुरूषांचे विचार तुमच्या सोबतीला नेहमीच असू द्या यशाचे आपण वाटेकरी बनाल. असे परखड मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातील दाखले देत त्यावेळी मी व्यक्त केले.
तेजस राऊत ह्या विद्यार्थी मित्राने श्रमीक आई-वडीलांच्या श्रमाला जोपासत दाहव्या वर्गात चांगले मार्क कमवीले त्याची शिकण्याची तळमळ सोबतच आपल्या शेजारच्या लहान मित्रांना सोबत घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेली सामुदायीक प्रार्थना नित्यनेमाने करतो. त्या मुलांनमध्ये भजनाची आवड निर्माण करतो. सुसंस्काराची पाठशाळा तो रोज भरवतो.
स्वतःसोबतच इतर तरूणांच भविष्य घडवीण्याचा त्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आज त्याच्या घरी जाऊन मी आणि माझ्या सौभाग्यवती पुष्पा रक्षक यांच्या हस्ते तेजस आणि त्याच्या आई-बाबाचा सन्मान करण्यात आला. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्मयोगीचे संघटन प्रमुख नासिर शेख, संचालन कर्मयोगीच्या नियोजन प्रमुख प्रविणा ठाकरे यांनी केले तर आभार पदर्शन महिला सक्षमीकरण प्रमुख शितल बारेवार यांनी केलं, व राष्ट्रवंदना घेत मनात चिरकाल आठवण राहील अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.