कर्मयोगी फाऊंडेशन : मुलींसाठी निशुल्क अभ्यासिका सुरू

नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर महिला सक्षमीकरण या विषयावर मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात बाहेर गावांवरून काम करण्यासाठी आलेले अधिकतर कंत्राटी व स्थायी कामगार त्यांना असलेल्या अल्प वेतनामुळे भाड्याने खोली करून एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये संसार थाटतात.

त्यामुळे त्यांच्या मुलांना अभ्यासासाठी पुरेशी जागा मिळत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन कर्मयोगी तर्फे गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने दि. 23 फेब्रुवारीला प्लॉट क्र. बी 33 लोकमत प्रेसच्या जवळ, सिडको कॉलनी, बुटीबोरी येथे कर्मयोगी फाऊंडेशन व प्रबोध अकॅडमी यांच्या सयुंक्त विद्यमाने मुलींसाठी निशुल्क कर्मयोगी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे.

या उदघाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता, आंतर्विद्या अभ्यास, राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठचे डॉ प्रशांत कडू उदघाटक स्वयंशोध फाऊंडेशनचे संचालक डॉ.चेतन रेवतकर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रबोध अकॅडमीचे प्रबोध येळण बुटीबोरी ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे शहर अध्यक्ष राजूभाऊ गावंड, चिरकाल वृत्तपत्राचे संपादक सुभाष राऊत गुरुजी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रकाश कडू म्हणाले की कर्मयोगीचं कार्य खरोखरच गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे सुरू आहे. आज श्रीमंत असो की गरीब कोणाकडेच संस्कारात्मक शांतमाय वातावरण नाही ही काळाची गरज लक्षात घेऊन अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बुटीबोरी परिसरातून येणाऱ्या दिवसात स्पर्धा परीक्षात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

उदघाटक डॉ. चेतन रेवतकर म्हणाले की खरोखरच कर्मयोगीचे कार्य बोलते नव्हे तर कर्ते व्हा या प्रमाणे आहे. मला आनंद होत आहे की ज्या अभ्यासिकेचा फायदा मोठ्या प्रमाणात गरिबांच्या मुलींना होणार आहे त्या अभ्यासिकेचे उदघाटन करण्याचे भाग्य मला मिळाले.

कर्मयोगी तर्फे बुटीबोरी व आजूबाजूच्या परिसरातील मुलींना आव्हान करण्यात आले आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात या अभ्यासिकेचा वापर करावा. तसेच दर महिन्याला प्रेरणादायी वक्ते आणून मुलींचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यईल असेही कर्मयोगी कडून सांगण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवाराकडून मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X