नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे कर्मयोगीचा गणेशोत्सव २०२३ दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गणेशांच्या चरणी हा उपक्रम गणेशोत्सवात सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत ११ दिवस अतिशय हालाकीच्या परिस्थितीत ज्यांनी दैदिप्यमान यश मिळविलं अशा गौरी गणेशांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या हस्ते करण्यात येऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येत आहे.
जेव्हा कर्मयोगी या उपक्रमा अंतर्गत कु. लकी बबलू बोपचे रा. गोंदिया हल्ली मुक्काम सुकळी बेलदार ता. हिंगणा जि. नागपूर या मुलाच्या घरी पोहोचले तेंव्हा लक्षात आले की लकीचे वडील तीन वर्षा अगोदर मानसिक स्थिती खराब होऊन घर सोडून गेले ते आजपर्यंत परत आलेच नाहीत. कर्मयोगी फाऊंडेशन ने अनाथचे नाथ झाले। शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिली.
बहीण नऊ वर्षाची असतांना स्वर्गवासी झाली तर दहावीला असतांना एकुलता एक आधार असलेल्या आईवर सुद्धा काळाने झडप घातली व लकीला पोरकं करून सोडलं. अशाही परिस्थितीत संकटाचा पहाड कोसळत असतांना सुद्धा आपल्या दूरच्या काकांच्या आधाराने कामाला जाऊन दहावीच्या परीक्षेत फक्त २ महिने शाळा करून ७३ टक्के गुण घेतले. सोबतच आय. पी. एस. होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या लकीच्या जिद्दीला नमन करत कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे लकीला महाज्योती नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक मा. राजेश खवले सर यांच्या हस्ते सन्मानित करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली.
लकीची हालकीची परिस्थिती बघता व त्याचे आय. पी. एस. होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी कर्मयोगीने मानवता जपत लगेच त्याचा अकरावी व बारावीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलून त्याला शाळेत जाण्यासाठी नवीन सायकल उपलब्ध करून दिली. यावेळी राजेश खवले म्हणाले की ज्यावेळी खऱ्या अर्थाने आधार हवा त्यावेळी कर्मयोगी त्याच्या पाठीशी उभे राहीले आहे.
तसेच खऱ्या अर्थाने राजकुमार बोपचे हे दूरचे काका असले तरी संकटाच्या काळात जवळ आले म्हणून त्यांनी बोपचे परिवाराचे सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक केले व माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला कोणतीही परिस्थिती थांबवू शकत नाही, त्यासाठी फक्त त्याला पेटून उठावे लागते हे सांगून त्यांनी अनाथ लकीचा मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास वाढविला.
यावेळी लकी म्हणाला की आमचा बोपचे परिवार खूप मोठा आहे पण मदतीला कोणीच आले नाही अशा परिस्थितीत आमच्या सारख्या अनेक गोरगरीब अनाथ मुलांचा आधार कर्मयोगी ठरत आहे, त्याबद्दल लकीने कर्मयोगी फाउंडेशन चे आभार मानले. हा आनंद सोहळा पाहण्यासाठी गावातील मंडळी व कर्मयोगी परिवारातील मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.