कर्मयोगी ही बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारी संस्था : अनिल देशमुख
नवरात्रोत्सव २५ सायकलचे वाटप करून कृतीतून साजरा
नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशनने आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी व त्यांनाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी २०२३ मध्ये १०१ सायकल वाटपाचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा २५ सायकल वाटपाचा तिसरा टप्पा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत २१ ऑक्टोबरला आई सभागृह बुटीबोरी येथे साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आतापर्यंत २२६ सायकलचे वाटप कर्मयोगी कडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गृहमंत्री अनिल देशमुख उदघाटक माजी आमदार रमेशचंद्र बंग, प्रमुख उपस्थितीमध्ये रंजना ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज बुटीबोरीचे व्यस्थापकीय संचालक जयसिंग चव्हाण, नागपूर विद्यापिठ आंतर्विद्या अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, रिलायन्स सिमेंट बुटीबोरीचे युनिट हेड बी. एम. तिवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुंटे ही प्रमुख मंडळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात अनिल देशमुख म्हणाले की संस्था अनेक आहेत पण कंपनीत काम करत स्वतःच्या खिशातून पैसे काढून बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारी गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या विचार सरणीवर चालणारी कर्मयोगी ही खरी संस्था आहे. त्यामुळेच त्यांनी या भागात खूप मोठं कार्य उभारलं आहे. आता कर्मयोगीला या परीसरातील उद्योगपतींनी सी एस आर फंड देऊन या चांगल्या कार्याला हातभार लावावा. या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन पाहून म्हणाले की इतका सुंदर व नीटनेटका कार्यक्रम मी आजपर्यंत बघितला नाही. आम्हाला आता हे सर्व कर्मयोगी कडून शिकावं लागेल अस ते आवर्जून म्हणाले.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी सांगितले की, विधवा महिलेच्या हाताने पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करत आमच्या वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींना बाल दुर्गा मानून त्यांना सायकल देऊन त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलविले ते पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो आहे.
तसेच हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी प्रामुख्याने नितीन लोणकर प्रभाकर देशमुख, भास्कर देशमुख, समीर देशमुख, संजय धोटे, ज्ञानेश्वर रक्षक, देवीदास लाखे, संजय चिकटे, संध्या आंबटकर राजू गावंडे, योगेश सातपुते, वामनराव सातपुते, अमजद शेख, मंगेश सवाने, यजेंद्र ठाकूर, कमलाकर अवचट, पूर्णचंद्र देशमुख संकेतसिंग दीक्षित, राजेश जयस्वाल, सुभाष राऊत, नारायण भिसे, विगेश तागडे, व दूरदूरच्या गावावरुन आलेली अनेक मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.