हैदराबाद : कर्मयोगी फाउंडेशन की ओर से स्वतंत्रता अमृत महोत्सव समारोह 2022 (नागपुर में बुटीबोरी (महाराष्ट्र) में बुधवार को संपन्न हुआ। इस दौरान फाउंडेशन ने 75 सैनिक परिवारों को सम्मानित किया गया। मुख्य रूप से कर्मयोगी फाउंडेशन को श्रीमती प्रीतम कौर नागरा को सम्मानित करने का सम्मान मिला। कौर के पति देश की रक्षा करते हुए शहीद हो गये थे। तब प्रीतम कौर की उम्र 18 साल की थी। प्रीतम को एक संतान है।
कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 सैनिक परिवारांचा सन्मान सोहळा
कर्मयोगी फाऊंडेशन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा 2022देशाचे रक्षण करतांना शहीद झालेल्या तसेच आजी माजी 75 सैनिक परिवारांना सन्मानित करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत प्रत्यक्ष कृतीतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि 10 ऑगस्ट 2022 रोज बुधवारला आई सभागृह बुटीबोरी येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर, उद्धाटक सकाळ वृत्तपत्र विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, प्रमुख उपस्थिती नागपूर ग्रामिणचे पोलीस अधीक्षक विजय मगर, जिल्हापरिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम कुंभेजकर, आजीवन ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वरदादा रक्षक, दिव्यांग भारतीय क्रिकेट टीमचे आंतराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत, माजी विंग कमांडर प्रतीक्षा ठाकरे, जॉन्सन लिफट बुटीबोरीचे वरिष्ठ मानव संसाधन मनीष मानापुरे या प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची आगमनापासून ते जेवणापर्यंतची शिस्तबद्ध पद्धती पाहून व कार्यक्रमातील सर्विकडे प्रेमाचे व आनंदाचे वातावरण पाहून अनेक सैनिक परिवार भारावून गेले व इतका अविस्मरणीय व प्रेमाळ सोहळा आम्ही आमच्या जीवनात पहिल्यांदा अनुभवला व खरंच कर्मयोगी फाऊंडेशनचे काम हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वाप्रमाणे आहे हे आनेका मंडळीनी बोलून दाखविले.