नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करणारे सामाजिक संघटन आहे. आपल्या नवनवीन कल्पकतेतून कर्मयोगी मार्फत मोठ्या प्रमाणात समाजभिमुख उपक्रम निरंतर राबविल्या जात आहेत.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी त्यांनि होळी सणानिमित्त वेणा नदी औद्योगिक क्षेत्र बुटीबोरी येथे सकाळी 7 ते 9 या वेळेत श्रमदान राबवून तेथील सर्व कचरा, प्लास्टिक वैगेरे ज्यामुळे आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो त्या कचऱ्याची योग्य ते विल्हेवाट लावून जो सुखा कचरा आहे तो एकाठिकाणी गोळा करून जो कचऱ्याचा मोठा ढिग तयार झाला.
अंततः त्याला पेटवत पर्यावरण पूरक होळी साजरी करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. हे श्रमदान यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.