नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन हे सातत्याने ग्रामीण भागातील गोरगरीब गरजवंत मंडळींसाठी विविध उपक्रम राबवून सेवा देत आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यातील वृद्ध मंडळींसाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. आतापर्यंत १०६ गावातील वृद्ध मंडळींना त्यांनी जवळपास ५००० आधार काठी (कुबळी) देऊन त्यांना प्रेमरूपी आधार दिला आहे.
या वृद्ध मंडळींच्या सेवेत आणखी भर घालत कर्मयोगी फाऊंडेशन व समता फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खापरी गांधी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे दि. ११ मे २०२२ रोज गुरूवारला मोतीबिंदू तपासणी शिबीर पार पडले. हे आतापर्यंत कर्मयोगी मार्फत घेण्यात आलेले मोतीबिंदू तपासणीचे १४ वे शिबीर होते.
शिबिरात खापरी गांधी, भीमनगर, पिंपरी, देवळी निस्ताने, गोंडवाना येथील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात डोळ्यांची तपासणी करून घेतली. या शिबिरात ज्या रुग्णांना मोतिबिंदू झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व रुग्णांवर १५ मे रोजी शालिनीताई मेघे रुग्णालय वानाडोंगरी येथे निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात यईल. येण्याजाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा खर्चही निःशुल्क राहील.
शालिनीताई मेघे रुग्णालय येथील डॉ. शितल मिश्रा, डॉ. प्रेरणा यादव, डॉ. उमेश वाढापूरे, दिव्यांनी हिवरे, उर्वशी नागोसे यांनी सेवा दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रशांत पाटील, ग्रामसेवक कृष्णाजी काळे, सामाजिक कार्यकर्त्या सरला लोखंडे प्रफुल्ल उईके, समता फाऊंडेशनचे संदीप हेडाऊ व कर्मयोगी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.