कर्मयोगी फाऊंडेशनची १०१ गावात आधार काठी वाटपाची संकल्पपूर्ती

नागपुर (महारष्ट्र) : २०२३ मध्ये कर्मयोगी फाऊंडेशनने वृद्ध मंडळींना प्रेमरूपी आधार देण्यासाठी १०१ गावात आधार काठी (कुबळी) वाटपाचा संकल्प केला होता. कर्मयोगी फाऊंडेशनने आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कार्य करत त्यांनी १०१ गावात आधार काठी वाटपाचा जो संकल्प २०२३ मध्ये एका वर्षात पूर्ण करण्यासाठी व्हेटला होता, तो आपल्या योग्य नियोजनाने व सातत्यपूर्ण कार्याने डिसेंबर अखेर ११४ गावात आधार काठी वाटप करून पूर्णत्वास नेला व २०२१ पासून आतापर्यंत १७५ गावात आधारकाठी वाटप करत वृद्ध मंडळींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

या उपक्रमाची सुरुवात नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी येथुन दि. २७ जून २०२१ रोजी करून पुढे घरोघरी वृद्ध लोकांचे सर्वेक्षण करून २०२१ मध्ये ३५ गावात २०२२ मध्ये २६ गावात व दिनांक २४ डिसेंबर 2023 ला ग्रामपंचायत भवन वलणी नागपुरात येथे कार्यक्रम घेऊन २१ वृद्ध मंडळींना आधार काठी देत १०१ गावात आधार काठी देण्याचा संकल्प ११५ गावात आधार काठी वाटप करत पूर्णत्वास नेला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वलणी ग्रामचे सरपंच स्वप्नील गावंडे, उदघाटक उपसरपंच दिनेश येसनकर, व गावातील प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.

म्हणले की कर्मयोगीने सामाजिक क्षेत्रात खूप मोठे कार्य आहे. ते यापुढेही आमच्या गावात जे काही उपक्रम राबवतील त्यांना आम्ही सर्वोतोपरी मदत करू या उपक्रमाविषयी सांगताना कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की २०२१ मध्ये आम्ही आई वडिलांची सेवा करणाऱ्या मुलांचे गणपती उत्सवात सत्कार आयोजित केले होते.

तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तेव्हा आम्हाला अनेक ठिकाणी वृद्ध मंडळींची अवहेलना मोठ्या प्रमाणात होताना दिसली. त्यामुळे, त्यावेळी आम्ही विचार केला की यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य कसं फुलवू शकू, आणि या विचाराचे कृतीत रूपांतर करत आधार काठीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ही आधार काठी देताना गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता वृद्ध मंडळींना प्रेमरूपी आधार देण्यासाठी आतापर्यंत १७५ गावातील वृद्ध मंडळींना आधार काठी देत प्रेमरूपी आधार देण्यात आला.

आपला स्वतःचा मुलगा आपल्या आई वडिलांना एक आधार काठी घेऊन देऊ शकत नाही आणि ईश्वराने आमच्याकडून आतापर्यंत १७५ गावात आधार काठी वाटप करून घेतले, त्याबद्दल आम्ही ईश्वराचे प्रचंड ऋणी आहोत. हा संकल्प पूर्ण झाला असला तरी आम्ही निरंतर इतरही गावात ही सेवा देत वृद्ध मंडळींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत त्यांना प्रेमरूपी आधार देत राहू. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी यशस्वी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X