कर्मयोगीने कृतीतून साकारला तुकाराम बीज व जागतिक महिला दिन
पांच हजार लोकांनी घेतला अन्नदानाचा आस्वाद
नागपुर : कर्मयोगी फाऊंडेशन ने आपले बोलते नव्हे तर कर्ते व्हा हे तत्व जोपासत 9 मार्च ला मेट्रो महल बुटीबोरी येथे तुकाराम बीज व जागतिक महिला दिन सोबत साजरा केला. त्यानिमित्ताने कर्मयोगी तर्फे 2023 मध्ये गरजवंत विधवा ताईंना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी 51 शिलाई मशीन वाटपाचा जो संकल्प करण्यात आला आहे.
त्यापैकी 17 गरजवंत विधवा ताईंना शिलाई मशीन देत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत या संकल्पाचा श्रीगणेशा करत कृतीतून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त सुप्रसिद्ध साहित्यकार सुरेंद्र बुराडे नागपूर यांचा तुकाराम महाराज यांच्या साहित्यावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानात सुरेंद्र बुराडे यांनी महाराजांच्या जीवनातील तीन अनमोल घटनांवर प्रकाश टाकत उपस्थित मंडळींना त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती करून दिली व त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूरचे अध्यक्ष
अहमदबाबु शेख, उदघाटक सातगावचे सरपंच योगेश सातपुते, प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भाजप नागपूर ग्रामिणचे आकाश वानखेडे, नागपूर जिल्हापरिषद सदस्य उज्वला बोढारे, प्रकाश नागपुरे, बाबू पठाण, रूपराव वाघ, पुष्पा काळे, संतोष शेंदरे, निलेश वरघने ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
विचारसरणीवर कृतीतून कार्य करणारी संस्था
अध्यक्षीय भाषणात अहमदबाबु शेख म्हणाले की खऱ्या अर्थाने संतांच्या विचारसरणीवर कृतीतून कार्य करणारी संस्था म्हणजे कर्मयोगी संस्था, त्यांचे कार्य इतके मोठे आहे की ते बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. यावेळी प्रमुख उपस्थिती मधे असणारे आकाश वानखेडे म्हणाले की कर्मयोगीच्या कार्याबद्दल तुम्ही सर्व अवगत अहात, कर्मयोगी बद्दल काय बोलायचे इतकं सुंदर कार्य करणारी टीम मी माझ्या 58 वर्षाच्या आयुष्यात आजपर्यंत बघितली नाही.
कर्मयोगी पासूनचं प्रेरणा
मी या टीमला शतशः नमन करतो यावेळी उज्वला बोढारे म्हणाल्या की मी जरी राजकीय, सामाजीक क्षेत्रात कार्य करत असली तरी मी कर्मयोगी इतके मोठे कार्य करूंच शकत नाही त्यांनी सामाजिक क्षेत्रात खूप मोठे कार्य उभे केले आहे. यावेळी उदघाटक योगेश सातपुते म्हणाले की मी कर्मयोगी पासूनचं प्रेरणा घेऊनच माझ्या गावात कार्य करत आहे इतके त्यांचे कार्य प्रभावी व प्रेरणादायी आहे.
या कार्यक्रमाला बुटीबोरी व आजूबाजूच्या गावातील महिला मंडळी व बुटीबोरी येथील प्रतिष्ठित पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मयोगी परिवारातील मंडळीनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.