Karmayogi Foundation : अनाथ नेहाच्या लग्नासाठी १० हजारची मदत, आजोबा व आजीच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य

नागपुर : महाराष्ट्र राज्य ज्या कर्मयोगीच्या उपक्रमाची दखल घेत आहे, कर्मयोगीचा तो उपक्रम चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया, हनुमान जयंतीला गोटाळी ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील आईवडील नसलेल्या कु. नेहा रवीचंद्र कामळे ताईच्या घरी जाऊन पोहोचला.

येत्या १ मे महाराष्ट्र दिनाला नेहा ताईचे लग्न होत आहे. ती सुखी संसाराच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला सुरवात करणार आहे. बालपणात ज्या आईच्या कुशीत झोपावं आई-आई करत खेळावं रांगाव ती आई अर्चनाताई दुधाचे होठ सोकण्या आधीच वयाच्या अगदी पंचविसाव्या वर्षी लग्नाच्या सहा वर्षानंतर नेहा दोन वर्षांची असताना अचानक (२००६) मध्ये बिमार पडली व देवाच्या घरी चालती झाली.

हा इतका मोठा आघात सहन करत वडील रामचंद्र यांनी अर्चनाताई गेल्यावर स्वतःचं वय ३० वर्ष असताना सुद्धा आपल्या मुलांसाठी दुसरी आई न आणता आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना सोबत घेऊन दोन वर्षांची नेहा व चार वर्षाचा दिनेश या आपल्या दोन मुलांचा वडिलांसोबत आईची जागा देऊन वेल्डिंगचे काम करत सांभाळ करू लागले. नियतीने एकदा पुन्हा या दोन्ही भावंडानवर मोठा आघात केला वडील रामचंद्र बाहेरगावी वेल्डिंगचे काम करायला गेले असता परत येताना (२०१६) मध्ये जमठा येथे अपघात झाला व या अपघाताने मुलांना अनाथ करून सोडून गेले.

संबंधित बातमी :

आजोबा हरिभाऊ कामळे व आजी अनुसया कामळे यांच्या डोक्यावरचे तर छप्परचं उडाले एकुलता एक मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर गेला. नातवांची जबाबदारी आता म्हातारपणात आजी आजोबावर आली. ती थकलेल्या खांद्याला उचलणे कठीण होते. यातही गेल्या १५ वर्षांपासून मोंढा बस स्टँडवर छोटे हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करत होते, त्यातही कोरोना आला व हॉटेल बंद पडले ते आजपर्यंत सुरूचं झालेच नाही.

या संकटाच्या काळात नेहा व दिनेश या बहीणभावाने आपले बारावी पर्यंत शिक्षण घेतले व पुढे परिस्थिती अभावी शिक्षण थांबवून आजी, आजोबांना सहकार्य करू लागले. संकटांच्या काळात कामळे परिवाराला गेल्या ३० वर्षांपासून नागपूर येथील सिंग परिवाराने आपली तीन एकर शेती निशुल्क शेती कासण्याकरिता दिली. यात आजोबा नातवाच्या सहकार्याने पीक घेतात व आपलं घर चालवितात. नेहा १८ वर्षाची झाली व ७८ वर्षीय आजोबा व ७० वर्षीय आजी यांना आपल्या डोळ्यासमोर मायबाप नसलेल्या नेहाचे लग्न व्हावे. भाऊ दिनेश याला सुद्धा या गोष्टीची कल्पना आली व अगदी लहान वयातच खाजगी कंपनीत काम करायला जाणे सुरू केले.

२०२४ लागताच वयाच्या विसाव्या वर्षी नेहाच्या लग्नाचा योग जुळून आला. मुलगा बाजारगाव येथील कंपनीत स्थायी कामगार आहे. त्यामुळे आजोबा आजी आनंदात आहेत, परंतु एकुलत्या एका नातीचे लग्न आनंदात कसे पार पडावे ही त्यांच्यासमोर सर्वात मोठी चिंता आहे. आपल्या जवळच असलं नसलं ते लावून आईवडिलांचे सुख न मिळालेल्या नेहाला भरभरून आनंद देण्यासाठी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतही तयारी करत आहेत. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत आजी आजोबाना प्रेमरूपी आधार देण्यासाठी कर्मयोगीने नेहाचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी हनुमान जयंतीला १० हजार रुपयांची मदत करत तिला साडीचोळी देऊन कृतीतून हनुमान जयंती साजरी केली. यावेळी गावकरी मंडळी व कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X