नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या विचार सारणीवर चालणार सामाजिक फाऊंडेशन आहे. तुकंडोजी महाराज सांगून गेले की माझी जयंती ही ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून ग्रामजयंती म्हणून साजरी करावे। तुकडोजी महाराज यांच्या इच्छेला अनुसरून कर्मयोगीने २४ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ या सात दिवसात आठ गावात ग्रामजयंती पर्व राबविले.
ग्रामजयंती पर्वाची सुरवात ही शिरुळ येथून ग्रामस्वच्छता अभियान राबवून करण्यात आली। त्यानंतर वारंगा, देवळी गुजर, आसोला, टाकळघाट, सोनूर्ली येथे सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत ग्रामस्वच्छता अभियान राबवित ३० एप्रिलला मांगली येथे हरिनामाच्या गजरात स्वच्छता अभियान राबवून ग्रामजयंती पर्वाची समाप्ती करत कृतीतून तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कावठा येथे या दरम्यान नेत्र तपासणी शिबीर राबवून निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात आली. ग्रामजयंती पर्वात गावागावातील भजन मंडळी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, गावकरी मंडळी व कर्मयोगीच्या सदस्यांनी सहभागी होऊन गावंगाव स्वच्छ व सुंदर झालं पाहिजे त्यासाठी आपण सुध्दा मनाने तितकंच स्वच्छ व सुंदर असलो पाहिजे हा संदेश कृतीतून देऊन तुकडोजी महाराज यांना अपेक्षित जयंती साजरी केली, त्यामुळे कर्मयोगीच्या या उपक्रमाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौतुक केल्या जात आहे.