नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे २०२२ मध्ये १५१ सायकल वाटपाचा संकल्प पूर्ण केल्यानंतर २०२३ मध्ये सुद्धा आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी व त्यांनाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी १५१ सायकल वाटपाचा संकल्प करण्यात आला होता.
या संकल्पाचे नियोजन पाच टप्प्यात करून सुरवात ३ जून जागतिक दिनाला पहिल्या टप्प्यातील २५ सायकली देऊन करण्यांत आली. त्यानंतर २५ सायकल वाटपाचा दुसरा टप्पा २४ सप्टेंबर गणेशोत्सवात, २५ सायकल वाटपाचा तिसरा टप्पा नवरात्रोत्सवात २१ ऑक्टोबरला, २५ सायकल वाटपाचा चौथा टप्पा संविधान दिन २६ नोव्हेंबरला व पाचव्या टप्यातील ५१ सायकलचे वाटप कर्मयोगी व टीम फेरो अलॉय प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी यांच्या सौजन्याने दि. २१ जानेवारी २०२४ ला आई सभागृह बुटीबोरी येथे करून या दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत १५१ सायकल वाटपाचा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे आतापर्यंत कर्मयोगी कडून ३०२ सायकलचे वाटप करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पुणेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उदघाटक टीम फेरो अलॉय प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरीचे व्यवस्थापकीय संचालक अनुप गुटगुटीया, प्रमुख उपस्थितीमध्ये शिवराज पडोळे उपविभागीय अधिकारी काटोल, संदीप राक्षे ज्येष्ठ साहित्यिक व मराठी चित्रपट निर्माते पुणे, शरयू तायवाडे प्राचार्य तायवाडे कॉलेज कोराडी, संदीप गोयंका उद्योजक नागपूर, नरेंद जिचकार उद्योजक नागपूर नितीन वरणकर प्रसिद्ध वऱ्हाडी कवी शेगाव ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले की कर्मयोगी मोठ्या प्रमाणात या भागात दुखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य करत आहे. कर्मयोगीच्या कार्याची मांडणी व त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती अतिशय प्रभावी आहे. त्यांच्या पुढील उपक्रमाला मी स्वतः समोर होऊन सहकार्य करेल असे यावेळी खाबिया आवर्जून म्हणाले.
यावेळी उदघाटक अनुप गुटगुटीया म्हणाले की कर्मयोगी ज्या प्रकारे समर्पित होऊन सामाजिक कार्य करत आहे, त्यामुळे सामाजिक सेवेत त्यांच्यापेक्षा दुसरं चांगल उदाहरण देता येणार नाही. प्रत्येक माणसाने मानवी जीवनात सामाजिक कार्य करायला हवं ज्यांना श्रम स्वरूपात जमेल त्यांनी श्रम स्वरूपात करावे ज्यांना धन स्वरूपात जमेल त्यांनी धन स्वरूपात करावे. आम्ही यापुढेही कर्मयोगीला सहकार्य करत राहू असे यावेळी गुटगुटीय म्हणाले.
या कार्यक्रमाला, उदय गुटगुटीया व संपूर्ण परिवार, दिनकर कडू, रमेश ठाकरे, संजय धोटे, देविदास लाखे, अनिल वाघ, राजू गावंडे, दिनेश इंगोले आशिष वरघणे, कल्पना मानकर, लता लाखे, माधुरी घोडमारे, वासुदेव घोडमारे, ममता चरडे ही प्रतिष्ठित मंडळी व जवळपास पन्नास गावातील मंडळी हा संकल्पपूर्ती सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आली होती. कर्मयोगी परिवाराने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.