कर्मयोगी फाऊंडेशन: नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीराला प्रचंड प्रतिसाद, निशुल्क चष्माचे वाटप व निशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया

नागपुर/हैदराबाद: कर्मयोगी फाऊंडेशन हे सातत्याने ग्रामीण भागातील गोरगरीब गरजवंत मंडळींसाठी विविध उपक्रम राबवून सेवा देत आहे. त्यातच नागपूर व हिंगणा तहसीलमधील प्रत्येक गावातील लोकांचे डोळे तपासून त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणण्याचा कर्मयोगीने पण केला आहे.

त्याच अनुषंगाने सोमवारला कर्मयोगी फाउंडेशन व ग्रामपंचायत टाकळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर व समता फाऊंडेशन यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर शिंगारे सभागृह येथे राबविण्यात आले.

या शिबिरात २९८ लोकांनी नेत्र तपासणी करुन घेतली यात ८६ लोकांना मोतीबिंदू, असल्याचे निदर्शनास आले. या लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथे २५, २७ व २९ सप्टेंबर २०२३ या तीन दिवसात निशुल्क करून देण्यात येणार आहे व येण्याजाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा खर्चही निःशुल्क राहील. तसेच या शिबिरात ज्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली आहे अशा १०९ लोकांना निशुल्क चष्माचे वाटप करण्यात आले.

शिबिराच्या उदघाटनाला प्रामुख्याने टाकळघाटच्या सरपंच शारदा शिंगारे उपसरपंच नरेश नरड ग्रामपंचायत सदस्य सुधा लोखंडे, बबिता बहाद्दूरे, राजश्री पुंड उपस्थित होत्या. उद्घाटनीय प्रसंगी बोलताना सरपंच शारदा शिंगारे म्हणाल्या की लहानांपासून ते वृद्धांपर्यंत कर्मयोगी आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर सातत्याने मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे. आमच्या ग्रामीण भागात कर्मयोगीने इतके कार्य केले आहे की मी सांगतो म्हटले तर दोन दिवस कमी पडतील. खरोखरच कर्मयोगी आमच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी वरदान ठरत आहे.

महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथील डॉ. अरविंद डोंगरवार, डॉ. तेजस कापसे, डॉ. गौरव साखरे, गौरव चंदेल, भुषण कांबळे, महादेव बावणे यांनी सेवा दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत टाकळघाट समता फाऊंडेशनचे संदीप हेडाऊ व कर्मयोगी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X