Congratulations : श्री स्वामी समर्थ मानव सेवा पुरस्काराने कर्मयोगी फाऊंडेशन सन्मानित

२१ हजार सन्मान राशी व सन्मान चिन्ह देऊन सन्मान

नागपुर (महाराष्ट) : कर्मयोगी फाऊंडेशन गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीवर बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर ग्रामिण भागात तळागळापर्यंत जाऊन मोठ्या प्रमाणात मानवतेचं कार्य करत आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात काम करणारे हे कामगार आपला एका दिवसाचा पगार जमा करून जे लोक आपल्या आईवडिलांन सोबत राहतात, त्यांचा योग्य सांभाळ करतात असे २२ लोक टप्पा टप्प्याने एकत्र आले व त्यांनी जवळपास ४७ उपक्रम राबवित २०७ गावात कार्याचा इतका मोठा विस्तार केला की हिंगणा आणि नागपूर तालुका त्यांनी कर्मयोगीमय करून टाकला, त्यांचे कार्य अमरावती व भंडारा जिल्ह्यात सुद्धा सुरू आहे.

कोणी कल्पना करू शकणार नाही असें कार्य त्यांनी केले ते म्हणजे कोरोना काळात ७१ दिवसां मिष्ठान अन्नदान, तसेच कोरोना काळात मोक्षधामची स्वच्छता राखत कोरोना मृतांची राख उचलण्यापासून कार्य केलं. आईवडील नसलेल्या मुलींना ३०२ सायकल वाटप, १२८ विधवा ताईंना शिलाई मशीन वाटप, १८५ गावात वृद्ध मंडळींना कुबळी वाटप, वृद्ध मंडळींचे मोठ्या प्रमाणात निशुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप, नवरात्रात १ हजार पेक्षा जास्त विधवा ताईंना साडीचोळी देऊन सन्मान, मुलींसाठी निशुल्क अभ्यासिका, विध्यार्थी व रूग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत, आईवडील नसलेल्या मुलींच्या लग्नाला प्रत्येकी १० हजार रुपये मदत, गावोगावी स्वच्छता अभियान व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, १०२ गावात प्रेमरूपी अभियान राबवित प्रत्येकाचे सुखदुःख जाणत त्यांना शक्य ती मदत केली. त्यामुळे सर्विकडे कर्मयोगीच्या लोकप्रियतेचे वारे वाहू लागले आहे.

यह पण वाचा:

अशावेळी सामाजिक कार्याला मदत करण्यास सतत आघाडीवर असणाऱ्या श्री स्वामी समर्थ धाम बेसा यांनी यावर्षी पासून श्री स्वामी समर्थ मानव सेवा पुरस्कार देण्याचे ठरविले व त्यासाठी विदर्भातुन कर्मयोगी फाऊंडेशनची निवड करत स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाला १० एप्रिल ला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत २१ हजार रुपये सन्मान राशी, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केल. यावेळी प्रामुख्याने स्वामी समर्थ धाम बेसाचे अध्यक्ष दिनकर कडु, डॉ प्रशांत कडू, अविनाश शेगावकर, ज्ञानेश्वर रक्षक, विजय इंगोले देविदास लाखे, जितेंद्र देशमुख, जयंत मोडक, संजीव झा, अर्चना देवतळे व मोठ्या प्रमाणात भविक भक्त तसेच कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X