कर्मयोगी फाउंडेशन : तुकडोजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त कर्मयोगीचे ग्राम जयंती पर्व साजरा

नागरपुर (महाराष्ट्र) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या सेवकांना सूचना केल्या होत्या की माझी जयंती साजरी न करता, माझा जन्मदिन ग्रामीण भागात विविध समाजप्रयोगी उपक्रम राबवत ग्राम जयंती म्हणून साजरा करावा.

कर्मयोगी फाउंडेशनने तुकडोजी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वप्रमाणे दि २४ ते ३० एप्रिल या दरम्यान ग्राम जयंती पर्व राबवले. या दरम्यान ११ गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. रुईखैरी येथे ग्रामस्वच्छता राबवून या ग्राम जयंती पर्वाची सुरुवात करण्यात आली.

पुढे, बोथली, मांडवा, सातगाव, टाकळघाट कानोली येथे सकाळी ७ ते ९ या दरम्यान ग्रामस्वच्छता राबवुन गावात स्वच्छतेचे महत्व कृतीतून पटवून देण्यात आले. खडकी येथे आरोग्य शिबीर तर रामा येथे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर राबवित लोकांना आरोग्याचे महत्व पटवुन देण्यात आले.

पिपलधारा, नागझरी व डेगमा खुर्द येथील वृद्ध मंडळींना आधार काठी (कुबळी) देत त्यांना प्रेमरूपी आधार देण्यात आला. विशेष म्हणजे डेगमा खुर्द हे गाव कर्मयोगी तर्फे आधार काठी वाटप करण्यात येणारे १०० वे गाव आहे. याच दरम्यान सातगाव येथील अंगणवाडी मधील मुलांना शालेय वस्तू व बिस्कीट वाटप करत त्यांना देण्याचे महत्व समजवून सांगण्यात आले. या सात दिवसात दररोज सायंकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.

बुटीबोरी येथे तुकडोजी महाराज यांच्या जन्मदिनी ३० एप्रिलला मधुकरराव झाडे यांच्या निवासस्थानी सामुदायिक प्रार्थना घेऊन ग्राम जयंती पर्वाची सांगता करण्यात आली. या दरम्यान कर्मयोगीचे यशस्वी नियोजन व कर्मयोगीच्या सदस्यांची कार्य करण्याची जिद्द व क्षमता ही चर्चेचा विषय ठरली.

या ग्राम जयंती पर्वात विविध गावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षकगण, गावकरी मंडळी व कर्मयोगी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेत ग्राम जयंती पर्व प्रत्यक्ष कृतीतून यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X