नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी गेल्या तीन वर्षांपासून नाविन्यपूर्ण कल्पना राबवत गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी त्यांनी कर्मयोगीचा गणेशोत्सव दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गणेशांच्या चरणी या शीर्षकाखाली हा उपक्रम १९ ते २९ ऑक्टोबर अशाप्रकारे ११ दिवस चालवला.
या उपक्रमातुन दैदिप्यमान यश मिळविणाऱ्या गौरी गणेशांच्या जिद्द व संघर्षाला नमन करत त्यांना सन्मानित करून, चांगला माणूस बनत, सेवा व जबाबदारी हा धर्म जपून आपला मानवी जन्म सार्थक करण्याचा संदेश आजच्या माणुसकी हरवलेल्या व पैसाचं सर्वकाही झालेल्या या स्वार्थी जगात प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. विशेष म्हणजे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आदर्श लोकांच्या हस्ते सपत्नीक या गौरी गणेंशांना सन्मानित करण्यात आले.
कर्मयोगी गणेशोत्सवाच्या पहिल्या मानकरी तन्मयी रविकांत पटले रा. बुटीबोरी यांनी दैदिप्यमान यश मिळवत शासकीय रुग्णालय गोंदिया येथे एम. बी. बी. एस करीता निवड झाल्याबद्दल डॉ. प्रशांत कडू -अधिष्ठाता आंतरविद्या अभ्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व त्यांच्या सौं. डॉ. सिमा कडू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दुसरे मानकरी तेजस नारायणराव राऊत रा. बुटीबोरी यांनी दहावी मध्ये दैदिप्यमान यश मिळवत मेकॅनिकल इंजिनीअर बनण्याचं ध्येय बाळगणाऱ्या तेजसला ज्ञानेश्वर रक्षक आजीवन ग्रामगिता प्रचारक व त्यांच्या सौं. पुष्पा रक्षक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तिसऱ्या मानकरी नयना बलराम गजबे, बोरखेडी रेल्वे यांनी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये स्वतःला पात्र ठरवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या नयनला संजय चिकटे सदस्य पंचायत समिती नागपूर व त्यांच्या सौं. अर्चना चिकटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
चौथे मानकरी साहिल शरदराव चौधरी, बुटीबोरी बारावी मध्ये प्रथम येत सिईटी परीक्षा उत्तीर्ण करत अभियांत्रिकी क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या साहिलला डॉ. भिमराव म्हस्के व त्यांच्या सौं. प्रतिभा म्हस्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पाचव्या मानकरी शिवानी राजू चिकनकर, रिधोरा या शेतकरी वर्गातील मुलीने मुंबई पोलीस दलात पदार्पण केल्याबद्दल स्वप्नील निंबाळकर प्राचार्य दत्ता मेघे विद्यालय बुटीबोरी व त्यांच्या सौं. दिपाली निंबाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सहावे मानकरी लकी बबलू बोपचे, सुकळी बेलदार या अनाथ मुलाने दहावी मध्ये दैदिप्यमान यश मिळवत आय. पी. एस. होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या स्वप्नीलला मा. राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती नागपूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सातवे मानकरी अजय शरद पेटकर रा. कान्होलीबारा यांची इंडियन आर्मी मध्ये अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल आणि पॅरा कमांडो बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अजयला विठ्ठल गोविंद डहाके संस्थापक श्रीकृष्ण हायस्कूल कान्होलीबारा व त्यांच्या सौं. रमाबाई डहाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आठवे मानकरी सुमित भाऊराव तेलंग सातगाव यांनी बारावीमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत सनदी लेखपाल बनण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सुमितला योगेश सातपुते, सरपंच सातगाव व त्यांच्या सौं. प्रियंका सातपुते यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
नववे मानकरी रोहिणी विष्णुजी भोजने ह्या भंगार जमा करून विकणाऱ्याच्या मुलीने बारावीमध्ये दैदिप्यमान यश मिळवत, औषध निर्माण शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या रोहिणीला रुपराव वाघ आजीवन ग्रामगीता प्रचारक व त्यांच्या सौं. शोभा वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दहावे मानकरी करिश्मा राजेश्वर मेश्राम बुटीबोरी यांनी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये पदार्पण करत पोलीस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या करिश्माला प्रविण भोयर प्राचार्य बालाजी विद्यालय बुटीबोरी व त्यांच्या सौं. श्वेता भोयर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अकरावे मानकरी अमन बाबाराव क्षीरसागर बुटीबोरी यांनी बारावीमध्ये दैदिप्यमान यश मिळवत नौसेनेमध्ये कनिष्ठ आयुक्त या पदावर स्वतःला पात्र ठरवत नौसेनेमध्ये मोठे अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अमनला आशिषभाऊ वरघणे संचालक स्व. नारायणराव वरघणे विद्यालय बुटीबोरी व त्यांच्या सौं. भाग्यश्री वरघणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रत्यक्ष घरोघरी जाऊन दुसऱ्यांच्या मुलांचे कौतुक करत त्यांना गौरी गाणेशांच्या रुपात सन्मानित करणे या कर्मयोगिच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौतूक केल्या जात आहे.