नागपुर (महाराष्ट्र): कर्मयोगी फाऊंडेशन हे सातत्याने ग्रामीण भागातील गोरगरीब गरजवंत मंडळींसाठी विविध उपक्रम राबवून सेवा देत आहे. त्यातच नागपूर व हिंगणा तहसीलमधील प्रत्येक गावातील लोकांचे डोळे तपासून त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणण्याचा कर्मयोगीने प्रण केला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोज मंगळवारला कर्मयोगी फाऊंडेशन, संजयभाऊ चिकटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने व स्वामी विवेकानंद धर्मदाय हॉस्पिटल खापरी यांच्या सहकार्याने नेत्र व मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया सोबतच आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी रेल्वे येथे राबविण्यात आले.

MIDHANI
या शिबिरात ३०२ लोकांनी नेत्र तपासणी करुन घेतली यात ६५ लोकांना मोतीबिंदू, असल्याचे निदर्शनास आले. या सर्व ६५ लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्वामी विवेकानंद धर्मदाय हॉस्पिटल खापरी नागपूर येथे करून देण्यात येणार आहे. येण्याजाण्याचा, राहण्याचा व जेवणाचा खर्चही निःशुल्क राहील. तसेच या शिबिरात ज्यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली आहे अशा १२४ लोकांना निशुल्क चष्माचे वाटप करण्यात आले. सोबतच २२७ नागरिकांची आयुष्यमान कार्डसाठी नोंदणी करून २५ लोकांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले.

शिबिराच्या उदघाटनाला प्रामुख्याने रमेशचंद्रजी बंग माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, प्रकाश नागपुरे, अहमदबाबू शेख संजय चिकटे वृंदा नागपुरे, डॉ वैशाली गजभिये, वसंतराव कांबळे, किशोर धूर्वे, सुनील ढोके, प्रशांत रावळे बंडुजी गोटे, किशोर मिलमिले, बबलू डंभारे, हरीश फंड, कमलेश मून पंकज मून, राम धुर्वे, रमेश दरवनकर हि मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
हे पण वाचा:

उद्घाटनिय प्रसंगी बोलताना रमेशचंद्रजी बंग म्हणाले की कर्मयोगी फाऊंडेशनच्या कार्याचा विस्तार हा २०० पेक्षा जास्त गावात झाला आहे. मला त्यांच्या बऱ्याच कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यांची शिस्तबद्ध कार्यप्रणाली पाहून मी प्रभावित झालो आहे. त्यांचे प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे, त्यामुळे कर्मयोगीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी.

या शिबिराचे आयोजक संजय चिकटे सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत असे ते यावेळी आवर्जुन म्हणाले. स्वामी विवेकानंद धर्मदाय हॉस्पिटल खापरीच्या नेत्रतज्ञ डॉ रोशनी समर्थ व त्यांच्या चमूने वैद्यकीय सेवा दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संजय चिकटे मित्र परिवार व कर्मयोगी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.
