हैदराबाद: स्नेहबंध परिवार के नेतृत्व में 16 नवंबर को स्नेह मिलन और गुणवंत सम्मान समारोह की लगभग सभी तैयारियां पूरी हो चुकी है। नव दुल्हन की तरह सजी है कोडशी। पूरा गांव (कोडशी बु. तहसील कोरपना, जिला चंद्रपुर, महाराष्ट्र) अतिथियों के स्वागत के लिए तैयार है। स्थानीय लोग दिन रात मेहनत कर रहे है। ताकि कोई कमी नहीं रह पाये। आयोजकों से लेकर हर एक व्यक्ति के चेहरे पर खुशियां ही खुशियां झलक रही है। स्थानीय लोगों का मानना है कि यह स्नेह मिलन और गुणवंत सम्मान समारोह उनके लिए दिवाली से बढ़कर है। इस समारोह में गांव छोड़कर रोजगार और नौकरी की तलाश में बाहर गये और कईं सालों से नहीं आ पाये और अपनों से नहीं मिल पाये उन सभी का यह मिलन समारोह है।
आयोजकों ने बताया कि दो सत्रों में आयोजित इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मा. सुरेश ना. राजूकर (जिला व सत्र न्यायाधीश जलगांव) और मा. एडवोकेट अनिल अ. ढवस) प्रसिद्ध हाईकोर्ट वकील, नागपुर व पूर्व न्यायाधीश) मचासीन होंगे। समारोह का उद्घाटन 10 से आरंभा होगा और दोपहर 2 बजे तक जारी रहेगा। इस दौरान स्नेबंध परिवार के सदस्य अपने विचार रखेंगे। स्थानीय लोगों का परिचय दिया जाएगा। इसके बाद मुख्य अतिथि का संबोधित होगा। दूसरा सत्र 2.15 से शाम 5 बजे तक जारी रहेगा। इस अवसर पर स्नेहबंध परिवार का संबोधन और स्थानीय लोगों परिचय कार्यक्रम होगा। इस अवसर पर 80 साल के वयोवृद्धों का सम्मान किया जाएगा। इसके बाद प्रीति भोज का आयोजन होगा। आयोजकों ने सभी से इस कार्यक्रम में भाग लेकर सफल बनाने का आह्वान किया है।
बालाजी आर हिंगोले के इस मराठी लेख में हैं बहुत कुछ
कोडसी बु. गांधीनगर पैनगंगा आणि विदर्भ नदीच्या संगमावर वसलेलं सुंदर आणि सुसंस्कृत गाव. भौगोलिक दृष्ट्या समृद्ध म्हणता येईल अशी नैसर्गिक देण या गावाला लाभलेली आहे. पैनगंगेच्या कुशीत आनंदाने विराजमान झालेल्या या गावाची सुपीक शेती आणि या मातीतून मोती पिकवणारा कष्टकरी कास्तकार या काळ्या आईची सेवा इमाने इतबारे करतो. आधुनिक पद्धतीच्या अवजारांचा,औषधांचा वापर करून कापूस, सोयाबीन, तूर, मिरची, हळद, इत्यादी पिके घेतो. विशेष म्हणजे कुणबी, आदिवासी व इतर सर्व समाज गुण्या गोविंदाने आनंदाने एकत्र नांदतो. सर्वजण शिक्षित-सुशिक्षित आहेत. कारण इथल्या जि प शाळेची स्थापना 1935 ची आहे. राजुरा तालुक्यातील पहिले bsc मा. डी एन मालेकर आहेत. वणी या सूसंस्कृत तालुकयाशी या गावाची atachment होती.
राजकीय क्षेत्रात मा.भगवान पाटील मालेकर यांनी चांगली छाप पाडलेली होती..त्यांचा वारसा अजूनही मालेकर मोहितकर चालवत आहेत. सांगायची गोष्ट अशी की राजकीय , शैक्षणिक सांस्कृतिक, न्यायिक, खेळ व इतर सर्व क्षेत्रात अनेक धुरंदर धुरीण अटकेपार पोहचले आहेत या गावाला आणि गावाचा या वीरांना अभिमान आहे. जुना काळ जसा गाजवला तसा नवीन काळ तरुण पिढीने काबूत ठेवला आहेच. दोन दोन न्यायमूर्ती, प्रसिद्ध वकील, इंजिनीअर, लेक्चर्स, कंपनी मालक, संस्थाचालक, शिक्षक, अनेक क्षेत्रात Respectively कोडसी, गांधीनगर वासी पोहचले आहेत. या गावातील अनेक कुटुंब आजूबाजूच्या गावांनीही वसले आहेत. या गावातील पात्रांचा जेंव्हा आपण विचार करतो, तेव्हा प्रत्येकाची हरहुन्नरी आपल्याला सुखावून जाते. आदर सन्मान ,जिव्हाळा ही नाळ घट्ट विणल्याची जाणीव आपणास होते. सुखाला दुःखाला सामोरे जातांना ही माणसं एक होतात. अनेक पूर यांनी अंगा खांद्यावर घेतलेली आहेत. न डगमगता या पैगंगेच्या साक्षीने ताठ उभी आहेत. यातच सर्व आले.
या सर्व सूसंस्कृत, सुजनांचा मेळा म्हणजेच स्नेहबंध सोहळा. स्नेहबंध ही संकल्पनाच विलक्षण अद्भुत आहे. सर्वांना एका धाग्यात गुंफणारी स्नेहबंध गाव आणि गावाबाहेरील सर्वजण, विचारांची-आपुलकीची देवाण घेवाण करण्यासाठी एका छताखाली एकत्र येणार, एकाचवेळी एकमेकांची गळाभेट घेणार. या धकाधकीच्या काळात श्वास घ्यायला उसंत मिळत नाही. एक खूप मोठा काळ आपण मागे टाकला आहे. सगे सोयरे, मित्र सवंगडी यांना द्यायला वेळच नाही, आपल्याकडे, त्यामुळे स्नेहबंध पुढे आला.
आपण आपल्या नाना ढंगी जेष्ठ पात्रांना सन्मान देणार ही गोष्टच किती भारी वाटते आहे. ज्या वयात कळत नकळत आपण ज्यांच्यामुळे आहोत, त्यांच्याकडेच आपले दुर्लक्ष होत जातं आणि म्हणून त्यांच्यासाठी हा सन्मान न भूतो न भविष्यती असाच ठरणार आहे. आपण त्यांचं देणं आहोत. गुणवंताचा सत्कार आणि सन्मान ही आपली संस्कृती, त्यांना भावी आयुष्याची उभारी देणारी ठरणार आहे.
यशाचे शिखर गाठणारांचे मनोगत म्हणजे सर्वाना आपल्याच माणसांची स्टोरी ऐकतांना मन भरून येणार आणि काही शिदोरी आपल्यालाही मिळणार तसा हा कृष्ण कालाच आहे सर्वांसाठी. दोन्ही गावकरी या दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर मेळा भरवणार आणि त्याला कुठलाच सवंग प्रसिद्धीलोलुप गंध नसणार, सगळीकडे स्नेह आणि स्नेह च असणार. ज्या आयोजकांनी, गावकरयांनी या संकल्पनेला पुढे घेऊन जाण्यासाठी मेहनत घेतली आहे, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. हा सोहळा सर्वांचा आहे, सगळ्यासाठी आहे, सर्वांनी याचा लाभ आणि आनंद घ्यायला हवा एवढेच. कसलाही अभिनिवेश, अहंकार न ठेवता याची देही याची डोळा या वृत्तीने आनंद लुटावा. कारण या उंच शिखरावर पोचण्यासाठी मुळवा तुम्ही सर्वांनी घातलेला आहे. म्हणून भेटा, बोला, ऐका आणि स्नेह वाटा आणि घ्या.