कर्मयोगी ने प्रेमाचा गोडवा देत साजरी केली छत्रपती शिवाजी जयंती

नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगीच्या प्रत्येक उपक्रम हा वेगळेपण जोपासणारा व नाविन्यपूर्ण संदेश देणारा असतो. हीच कार्यप्रणाली त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीदिनी सुद्धा लोकांना प्रेमाचा संदेश देत निदर्शनास आणून दिली.

मेट्रो चौक बुटीबोरी येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कसलाही गाजावाजा न करता हजरों गावकरी मंडळींचे सकाळच्या थंड प्रहरी प्रत्येक व्यक्तीचे आत्मीयतेने औक्षण करत त्यांना प्रेमाचं प्रतीक गुलाबपुष्प देऊन, चहा बिस्किटचा प्रेमरूपी गोडवा देत जयंती कृतीतून साजरी करण्यात आली.

अनेक लोक स्वतःच औक्षण करत गुलाबपुष्प घेतांना भारावून गेले होते. इतक्या सुंदरपणे हजारो लोकांचे औक्षण करत प्रत्येकाला गुलाबपुष्प देऊन प्रेमाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं आश्चर्य व्यक्त करत होते. महाराजांची कृतिशील जयंती साजरी करण्यासाठी कर्मयोगी परिवारातील मंडळीनी यशस्वी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X