कर्मयोगी फाऊंडेशन : लग्नाच्या पत्रिका छापायला सुद्धा पैसे नाहीत हे सांगणाऱ्या ममताला दहा हजारची मदत

नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे विचार कृतीतून घरोघरी पोहोचविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करत आहे. ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. ही गोष्ट हेरून कर्मयोगीने आईवडील नसलेल्या गरीब मुलींच्या लग्नाला प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचा संकल्प केला आहे. कर्मयोगीचा हा संकल्प ६ एप्रिल ला वडिलांचे छत्र हरवलेल्या पिपळधरा ता. हिंगना जिल्हा नागपूर या आदिवासी गावातील कु. ममता जगन उईके यांच्या घरी जाऊन पोहोचला.

येत्या १७ एप्रिल ला ममता ताईंचे लग्न होत आहे. जीवनाच्या नवीन पर्वात ती प्रवेश करणार आहे. बाबा हा शब्द मुखातून उच्चारणे येण्याच्या अगोदर एक महिन्याची असतांनाच वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे बालपण गरिबीचे चटके खात खात गेले. गरिबी इतकी होती की वडीलांना हमालीचे काम करतांना पायाला लोखंडी सलाख लागून इजा झाली व त्यावर योग्य औषधोपचार न झाल्याने पायात विष निर्माण होऊन त्यांतच जगनरावांची प्राणज्योत मावळली. आई अंतुलाबाईने हातमजुरी करून व मिळेल ते काम करून आपल्या कुळामतीच्या घरात दोन मुली व एका मुलाला मोठे केले. ममता सर्वात लहान तिने आपले बारावी पर्यंतचे शिक्षण अशाही परिस्थितीत पूर्ण करत संगणक प्रशिक्षण घेतले व नेटकॅफे मध्ये काम करत आईला आधार दिला. या काळात मोठ्या बहिणीचे व भावाचे लग्न झाले.

आता ममताचे लग्न करायची वेळ आली तर होता नोव्हता पैसा दोन्ही लग्नात खर्च झाला. भावाने तर लग्न होताच कोणतीही जबाबदारी न घेता आपली चूल वेगळी मांडली. ममताने चोविसव्या वर्षात पदार्पण केले परंतु ममताच्या लग्नासाठी कोणीच पुढाकार घेत नोव्हत, येणारा पाहुणासुद्धा घरची गरिबी पाहुन व करणार कोणीच नाही हे लक्षात येताच बसायला सुद्धा तयार नोव्हता. शेवटी गावातील एका आईच्या मानलेल्या मामाने पुढाकार घेतला व आंतरजातीय विवाह दोन्ही परिवारांच्या संमतीने जुळवून आणला.

मुलगा इतका समजदार मिळाला की त्याने उईके परिवाराची परिस्थिती लक्षात घेऊन लग्नाचा सर्व खर्च स्वतः उचलून आपल्या घरून लग्न करण्यासाठी पुढाकार घेतला. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत कर्मयोगीने ममताचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी वामन कोहाड व वर्षाताई कोहाड यांच्या हस्ते १० हजार रुपयांची मदत करत, साडीचोळी देऊन ममताला मायेचा आधार दिला.

यावेळी भावना व्यक्त करतांना ममताचे अश्रूं काही केल्या थांबायला तयार नोव्हते, ती म्हणाली बाबा हा शब्द ऐकला पण, बाबा कसे असतात ते पाहले नाही व अनुभवले सुद्धा नाही. बाबांचे नातेवाईक तर आजपर्यंत दिसलेच नाहीत. अशाही परिस्थितीत आईने योग्य संगोपन केले, गावातील मानलेल्या आईच्या मामाने आंतरजातीय लग्न जुळवून आणले. मुलाकडेच सर्व लग्नविधी पार पडणार आहे.

आमच्याकडे तर पत्रिका छापायला सुद्धा पैसे नाहीत अशा परिस्थितीत कर्मयोगी आमच्या पाठीशी उभे राहले त्यांचे आभार कसे मानावे यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवून मी या संस्थेशी जुळून भविष्यात अनेक गोरगरीब लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करेल अशी ममताने इच्छा व्यक्त केली. यावेळी गावचे उपसरपंच धोंडबाजी उईके, अमोल उईके, रवींद्र सयाम, गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X