Karmayogi Foundation : अंजलीच्या लग्नासाठी १० हजार रुपयांची मदत

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कृतीतून साजरी करत लग्नासाठी १० हजार रुपयांची मदत

नागपुर (महाराष्ट्र) : चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम कर्मयोगी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबवित आहे. प्रत्येक कार्याला कृतीचा आधार असावा यावर कर्मयोगी मोठ्या प्रमाणात भर देते म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कर्मयोगी बाबासाहेब यांची जयंती त्यांच्या विचारातून साजरी करण्यासाठी याच्या चौथ्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेल्या जुनेवानी ता. जिल्हा नागपूर या गावातील कु. अंजली कोठीराम मडावी यांच्या घरी जाऊन पोहोचले.

येत्या २१ एप्रिलला अंजली ताईंचे लग्न होत आहे. जीवनाचा नवीन प्रवास ती सुरू करणार आहे. बालपणी वयाच्या अगदी चवथ्या वर्षी नियतीने वडिलांना काळाच्या पडद्याआड करत अंजलीला वडिलांच्या प्रेमापासून पोरके केले तर आई दुर्गाताईंचे सौभाग्य लग्नाच्या पाच वर्षांनंतर हिरावुन घेत अंजली व ५ महिन्याच्या अविनाशला ताईंच्या पदरात हालअपेष्टा सहन करायला सोडून गेले. यानंतर दुर्गाताई स्वतःला प्रचंड त्रास घेत जगल्या त्या फक्त आपल्या मुलांसाठी, त्यामुळेच त्यांनी जुनेवाणी सोडले व बाजारगाव हे आपले माहेर गाठत काही दिवसा अगोदर जीवघेणा स्फोट झालेल्या सोलर कंपनीत काम करत मुलांचा सांभाळ करणे सुरू केले. या काळात मूलसुद्धा सुटीच्या दिवशी मिळेल ते काम करत आपल्या आईला मदत करत होते. गेल्यावर्षी जुनेवाणी येथे त्यांच्या पडक्या घराला घरकुल योजनेने आधार दिला व एक रूम सिमेंट काँक्रीटची तयार झाली.

याच काळात अंजली १८ वर्षाची झाली, तिने आपले पदवीचे शिक्षण घेणे सुरू ठेवले, परंतु आईला तिच्या लग्नाची चिंता लागली व या चिंतेचे निराकरण आपल्या भावाच्या मुलाशी यावर्षी लग्न जुळून झाले. आता लग्न तर जुळले, व त्यातही आनंद व प्रेम काय असते हे पाहण्यासाठी आतुर असलेल्या अंजलीचे लग्न चांगले करावे ही आईची मनोमन इच्छा त्यासाठी त्या कर्ज काढणार आहेत व ते परत करण्यासाठी पुढे मोठ्या प्रमाणात आपल्या जीवाचे रान करणार आहेत. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत कर्मयोगीने अंजलीचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी गोरगरीब वंचित लोकांसाठी आपले जीवन खर्ची केलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला १० हजार रुपयांची मदत करत तिला साडीचोळी देऊन कृतीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना गावचे सरपंच चिंतामण फटींग म्हणाले की कर्मयोगीचं कार्य हे क्रांती आहे परिवर्तनाची नांदी आहे. मी माझ्या आयुष्यातही आजपर्यंत असं संघटन पाहत नाही ज्याचं या गावात कोणी रक्ताचं नाही, कोणी नातेवाईक नाही, कसल्याही आदर सत्काराची अपेक्षा न करता दुःखी व गरजवंत लोकांचा शोध घेत मदत करणे हे अदभूत कार्य आहे. कर्मयोगीच्या रूपाने साक्षात आमच्या गावात गाडगेबाबा व तुकडोजी महाराज आले आहेत असे ते यावेळी आवर्जुन म्हणाले. यावेळी गावकरी मंडळी व कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X