Karmayogi Foundation : वडिलांचे छत्र हरवलेल्या करिनाच्या लग्नाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत

नागपुर (महाराष्ट्र) : २०२४ मध्ये चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम कर्मयोगी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबवित आहे. या उपक्रमा अंतर्गत तेरावी लग्न कार्यासाठी मदत वडिलांचे छत्र हरवलेल्या उखळी ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील कु. करीना मनोहरराव मडावी ताईला देण्यासाठी स्वतःचे घर नसलेल्या व आपल्या भावाच्या आधाराने रहात असलेल्या सावित्री उईके यांच्या घरी जाऊन पोहोचले.

येत्या १६ मे ला करीना ताईचे लग्न होत आहे. ती सुखी संसाराच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला सुरवात करणार आहे. ज्या प्रकारे नदी डोंगर, दऱ्या, खोऱ्यांमधून आपला खडतर प्रवास करत असते तसाच खडतर प्रवास करीनाच्या आई सावित्रीताई आपल्या करिश्मा, आशावरी व करीना या तीन मुलींना घेऊन करत आहेत. माहेरची गरीब परिस्थिती असल्यामुळे कमी वयात सावित्रीताई यांचे नवेगाव येथील मनोहरराव यांच्याशी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर लगेच सावित्री ताईंच्या लक्षात आले की मनोहरराव यांना दारूचे व्यसन आहे. तरीही ताईंनी आपल्याला जे मिळालं त्याचा स्वीकार करत आपला संसार सुरू केला. या दरम्यान तीन मुलींचा जन्म झाला, परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाकिची होत चालली होती त्यातही मनोहरराव यांचे दारूचे व्यसन कमी न होता वाढतच चालले होते.

एक दिवस शेवटी मनोहरराव यांच्या दारूच्या व त्यातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून घर सोडले व उखळी येथे आपल्या भावाकडे येऊन राहू लागल्या. भाऊ काशिनाथ उईके यांनी आपल्या बहिणीने मनोहरराव यांच्या व्यसनामुळे ज्या आतापर्यंत मरणयातना भोगल्या होत्या त्याची जाणीव होती, त्यामुळे त्यांनी ते ज्यांच्याकडे काम करतात त्या पटवर्धन यांच्याकडे ताईला शेतकामाला लावून त्यांच्या शेतमनुरांसाठी बांधलेल्या घरांमध्ये एक खोली आपल्या बहिणीला रहायला मिळवून दिली. ताई व मुली मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करू लागल्या. परिस्थिती अभावी कोणीही दहावी बारावीच्या पुढे शिकल नाही. या दरम्यान मामा काशीनाथ उईके यांनी पुढाकार घेत करिष्मा व आशावरी या दोन मुलीचे लग्न लावून दिले. याच दरम्यान दारूने कहर केला व २०१६ मध्ये मनोहरराव यांची प्राणज्योत मावळली. मुलींनी वडिलांचे सुख कधी बघितलेच नाही. त्यांचा मामा दुसऱ्यांकडे शेतमजुरी करत आपल्या परिवारासह या मुलींसाठी शक्य ती मदत करत आपल्या बहिणीला आधार देत आहे.

संबंधित बातमी-

सावित्रीताईंनी आपल्या दोन मुलींच्या लग्नासाठी बचत गटातून घेतलेले कर्ज फिटता फिटेना व इकडे करिनाचे लग्न सावित्री ताईला डोळ्यासमोर दिसत होते. शेवटी मामाच्या सहकार्याने यावर्षी करीनाचे लग्न जुळवून आले. मामा याही लग्नाला शेतमजूरी करून शक्य तितकं सहकार्य करणार आहे. आईसुद्धा आपल्या शेवटच्या मुलीचे लग्न आनंदात पार पडावे यासाठी धडपड करत आहे. नवऱ्या मुलाने सुद्धा मुलीच्या परिस्थितीची जाणीव ठेवत कोणतीही मागणी केली नाही. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत सावित्रीताई यांच्या वेदना कमी करण्यासाठी कर्मयोगीने करिनाचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करत तिला साडीचोळी देऊन कर्मयोगी गाडगेबाबा यांचे विचार कृतीतून जपले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना करिना म्हणाली की बाबाचं प्रेम काय असते हे कधी मी पहिलच नाही. लहानपणापासून आई सोबत कामाला जाऊन कसेबसे बारावी पर्यंतचे शिक्षण केले. मामाची मदत व आईचे अपार कष्ट यातूनच माझे लग्न जुळले. आजपर्यंत आमच्या नातेवाईकान शिवाय कोणी आम्हाला मदत करायला आले नाही. बाहेरचे लोकं सुद्धा मदत करतात हे मी पहिल्यांदा कर्मयोगीत बघितले, तुम्ही आम्हाला गरज असताना मदत केली त्याबद्दल मी मनापासून कर्मयोगीचे धन्यवाद मानते. यावेळी गावकरी मंडळी व कर्मयोगीचे सदस्य हा मदतीचा व प्रेमाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X