Karmayogi Foundation : आईचे छत्र हरवलेल्या नयणला लग्नासाठी मिळाली 10 हजार आर्थिक मदद

नागपुर (महाराष्ट्र) : चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करू या हा उपक्रमा अंतर्गत फक्त एका महिन्यात अकरावी लग्न कार्यासाठी मदत घेऊन कर्मयोगी आईचे छत्र हरवलेल्या मोहंगाव ढोले ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील कु. नयण मनोहर फरकाडे ताईच्या घरी जाऊन पोहोचले.

येत्या २ मेला नयण ताईचे लग्न होत आहे. ती सुखी संसाराच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला सुरवात करणार आहे. नेहा ही अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत आपल्या शालिनी, दुर्गा, ममता या चार बहिणी सोबत मामाच्या घरी शिक्षण घेत लहानाची मोठी झाली. वडील मनोहरराव दुसरा वर्ग शिकलेले तर आई उषाताई दहावा वर्ग शिकलेल्या, घरी शेतीवाडी काहीचं नाही. त्यामुळे शेतमजुरी करून आपल्या चार मुलींचा सांभाळ केला, त्यात मुलींना शिक्षणासाठी कोणीही मार्गदर्शन करणार नसल्यामुळे व परिस्थितीमुळे शालिनी व नेहा या दोन मोठ्या बहिणींना बारावी नंतर शिक्षण थांबवावे लागले. मुली लग्नाच्या वयात येत असतांनाच, दोनाचे चार हात करून त्यांना आनंदाने सासरी पाठवण्याचे दिवस येत असताना, उषाताईला ब्रेन ट्युमरच्या बिमारीने ग्रासले व २०१९ मध्ये त्या आपल्या चारही मुली मनोहररावांच्या पदरात टाकून देवाघरी चालत्या झाल्या.

उषाताई ह्या शेतीतील डवरणी, निंदन खुरपण व मिळेल ते काम करून अशोकरावान सोबत आपल्या कष्टमय संसाराचा गाडा ओढत होत्या. त्या गेल्यामुळे मुलीचं नव्हे तर मनोहरराव सुद्धा एका मोठ्या आधारापासून पोरके झाले. अशाही परिस्थितीत त्यांनी आपली जबाबदारी सांभाळत आपली मोठी मुलगी शालिनीचे लग्न २०२१ मध्ये उरकून टाकले, तरी खांद्यावरचा भार हलका होणार नोव्हता समोर तीन मुलीचं भविष्य त्यांच्या डोळ्यासमोर होत. दुसरी मुलगी नयण सुद्धा यावर्षी २१ वर्षाची झाली व वडिलांची चिंता वाढु लागली, शेवटी या चिंतेचे निराकरण झाले व रामटेक येथील मुलासोबत नयणचे लग्न जुळून आले. मुलाला सुद्धा वडील नसल्यामुळे व गरीब परिस्थितीची जाणीव असल्यामुळे कोणतीही मागणी न करता दोघांनी सारखा खर्च उचलून रामटेक येथून लग्न करण्याचे ठरविले. आपल्या भावाची हातावर आणून पानावर खाणारी परिस्थिती पाहून नयणचे काका लग्नाला मदत करणार आहेत.

संबंधित बातमी :

या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत मनोहरराव यांना प्रेमरूपी आधार देण्यासाठी कर्मयोगीने नयणचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करत तिला साडीचोळी देऊन गाडगेबाबा यांचे विचार कृतीतून जपले. यावेळी उपस्थित गावकरी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की आमच्या उभ्या आयुष्यात पहिली संस्था पाहून राहलो की सरळ आमच्या गावात येऊन मदत करत आहात। यावेळी सर्व वातावरण भावनिक झालं होतं. या कार्यक्रमाला गावकरी मंडळी व कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X