वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबाची १४८ वी जयंती महोत्सव आनंदात पार

वणी (यवतमाळ, महाराष्ट्र) वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा याचा १४८ वी जयंती महोत्सव संत गाडगेबाबा स्मारक येथे पार पडला. संत गाडगेबाबा चौक ते संत गाडगेबाबा स्मारक पर्यंत भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली. सांयकाळी सन्मानित पाहुण्यांचा सत्कार व लगेच सांस्कृतिक कार्यक्रम चालू करून लहान मुलाचे डांस कार्यक्रम झाले.

उपस्थित असलेल्या सर्व बंधु भगिनींनी जेवण करुन कार्यक्रमाची सांगता केली. तसेच संत गाडगेबाबा चौक ते संत गाडगेबाबा स्मारक निळापुर रोड वणी पर्यंत ग्राम सफाई करण्यात आली. गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळ वाटप करण्यात आले.

कार्यक्रम स्थळी पाहुण्यांचे आगमन सन्मानित केलेल्या पाहुण्यांचे स्वागत मा. संजय रेड्डी बोदकुलवार आमदार वणी विधानसभा, मा. तारेन्द्रजी बोर्डे माजी नगराध्यक्ष वणी भाजपा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, मा. विजय बाबु चोरडिया सामजिक कार्यकर्ता वणी, स्थानीय पोलीस स्टेशन चे मा ठाणेदार साहेब मा. दिनकरराव पावडे भाजपा वणी, मा. बंडुभाऊ चांदेकर माजी जिल्हापरिषद सदस्य भाजपा,

मा. नारायण गोडे व धोबी समाजाचे सन्मानांनी मंचावर उपस्थित मार्गदर्शक यांचेही स्वागता करण्यात आले। यानंतर पाहुण्यांनी गाडगेबाबांच्या जिवणावर विचार व्यक्त केले. डॉ रेट पद्ववी मिळवलेले विनोद भाऊ आदे यांचा धोबी समाज कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान हे महादान म्हणल्या जाते असे रक्तदान शिबीर घेण्यात आले या रक्तदान प्रमुखाचे कमेटी कडून सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र तील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रखर विचार वंत प्रबोधनकार मा. लक्ष्मण दास काळे यांचे संत गाडगेबाबा यांच्या विचाराची समाजाला गरज या विषयावर समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाला सुरवात या प्रबोधन कार्यक्रमाने उपस्थित बंधु भगिनींन चे मन जिंकले. लक्की ड्रा च्या बक्षीसाचे वाटप असे बरेच समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजा समोर आदर्श ठेवला.

ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजक धोबी समाज सा. सां. संस्था, वणी. रजी. नं.एफ- ५३८१(य) अध्यक्ष राहुल चौधरी, उपाध्यक्ष अनिल खिरकर, सचिव संजय चिंचोलकर, सहसचिव सारंग बिहारी, कोषाध्यक्ष जनार्दन थेटे, सह कोषाध्यक्ष विनोद चिंचोलकर, सदस्य विजय वाघमारे, ज्ञानेश्वर डोळसकर, भरत बोबडे, रोशन चिंचोलकर, महेश बोबडे, धनराज हिवरकर, प्रशांत पत्रकार, मंगेश चिंचोलकर, सचिन क्षिरसागर, पवण बोबडे या सर्वांच्या एकते मुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला या साठी समाजातील काही लोकांची साथ पण मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X