कर्मयोगी फाऊंडेशन : हरिनामाच्या गजरात ग्रामस्वच्छता करत कृतीतून साजरी केली गाडगेबाबाची जयंती

नागपुर (महाराष्ट्र) : कर्मयोगी फाऊंडेशन हे दरवर्षी गाडगेबाबा यांची जयंती प्रत्यक्ष कृतीतून साजरी करते. याही वर्षी गाडगेबाबा जयंती आपल्या बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्त्वानुसार कर्मयोगी व गट ग्रामपंचायत खापरी मोरेश्वर, खैरी खुर्द ता. हिंगणा जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता राबवीत, संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. सोबतच टाळ मृदंगाच्या तालावर भव्य दिंडी सोहळा काढून हरिनामाचा गजर करत, आदर्श ग्राम निर्मितीचा संदेश देत अन्नदानाचा आस्वाद घेत कृतितुन साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हिंगणा पंचायत समिती सभापती सुष्मा कडू उदघाटक खापरी मोरेश्वरच्या सरपंच वंदना पाटील प्रमुख उपस्थिती मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर टाकळघाटचे अध्यक्ष शंकरराव खोडके उपसरपंच प्रशांत शेंडे ही मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. अध्यक्षीय भाषणात सुष्मा कडू म्हणाल्या की गाडगेबाबा यांचं कार्य खऱ्या अर्थाने दुःखीकष्टी लोकांची सेवा करत गावोगावी स्वच्छता अभियान राबवित कर्मयोगी पुढे नेत आहे. त्यांनी आमचा हिंगणा तालुका आपल्या सेवाकार्यातून पूर्ण पिंजून काढला आहे. त्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तितके कमी आहे।

उपसरपंच प्रशांत शेंडे म्हणाले की कर्मयोगीला सोबत घेऊन आम्ही कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या विचार धारेवर आमचे गाव आदर्श करण्याचा प्रयत्न करू असे ते यावेळी आवर्जून म्हणाले. आमच्या गावात आजपर्यंत असा सुंदर संदेश देणारा कार्यक्रम झाला नाही. हा कार्यक्रम कर्मयोगी फाऊंडेशनने घडवून आणला त्याबद्दल धन्यवाद मानत आमच्या गावात नित्यनेमाने सामाजिक कार्यक्रम राबवावे याचा गावकरी मंडळीनी आग्रह धरला. गाडगेबाबा जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी परिवाराने व गावकरी मंडळींनी यशस्वी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Archives

    Categories

    Meta

    'तेलंगाना समाचार' में आपके विज्ञापन के लिए संपर्क करें

    X